सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गट बरखास्त
मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुदती येत्या 21 मार्च 2022 रोजी संपणार आहेत. त्याअनुषंगाने निवडणूक आयोग कामाला लागले आहे.
सांगोला तालुक्यात नव्याने एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समितीचे गण वाढले असून या नव्याने करण्यात आलेल्या गटात व गणात भौगोलिक सलगता नाही. जवळा जिल्हा परिषद गट बरखास्तच करण्यात आलेला आहे.
त्यामुळे तालुक्यात नव्याने दोन गट वाढले असेच म्हणावे लागेल. तालुक्याची लोकसंख्या वाढली असल्याने जिल्हा निवडणूक प्रशासनाने गट व गणाची पुनर्रचना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तालुका प्रशासनाने ही नव्याने रचना केली. असे असले तरी ह्या नव्याने करण्यात आलेल्या रचनेवर हरकती, सूचना स्वीकारून अंतिम रूप दिले जाणार आहे.
गट व गण वाढल्याने नव्याने पुनर्रचना करण्यात आलेली आहे. यामध्ये महूद, वाढेगाव, चोपडी, घेरडी,अकोला, एखतपुर, कोळा व कडलास असे जिल्हा परिषद गट आहेत. जवळा जिल्हा परिषद गट हा बरखास्त करण्यात आलेला आहे. यामध्ये विशेषतः पंचायत समितीच्या गणाची फोड करताना प्रशासनाने भौगोलिक सलगता योग्य प्रकारे अमलात आणलेली नाही.
मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुदती येत्या 21 मार्च 2022 रोजी संपणार आहेत. त्याअनुषंगाने निवडणूक आयोग कामाला लागले असून प्रारूप आराखडा, गटांची व गणांची रचना तर जिल्ह्यात वाढलेले जिल्हा परिषद, पंचायत समिती गण यामुळे पुढाऱ्यांची डोकेदुखी वाढलेली आहे.
अशातच अधिकाऱ्यांनीही भौगोलिक सलगता न पाहता गटांची व गणांची रचना कशीही केली आहे. पूर्वी तालुक्यात सात जिल्हा परिषद गट व चौदा पंचायत समिती गण होते. आता वाढत्या लोकसंख्येमुळे गट आणि गण वाढलेले आहेत.

0 Comments