Breaking News

" त्या " रास्त भाव धान्य दुकानावर कारवाई का नाही ?

 " त्या " रास्त भाव धान्य दुकानावर कारवाई का नाही ?



रेंदाळ येथील रास्तभाव दुकानदाराकडून ग्राहकास धान्य दिलेनंतर प्रिंट पावती न देता मॅन्युअल पावती देवून ग्राहकांची फसवणूक करीत असलेल्या रेंदाळ येथील एका धान्य दुकानदाराने धान्याचा काळाबाजार केला आहे.


तर पुरवठा विभागाने या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने न पहाता संभ्रमात टाकणारी कारवाई केली आहे . परवाना रद्द करण्याची कारवाई न करता अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई केली आहे.त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत . 


एका तक्रारीच्या अनुषंगाने पुरवठा अव्वल कारकुन हातकणंगले यांनी रेंदाळ येथील त्या रेशन दुकानाची तपासणी केली असता सदर धान्य दुकानाव्दारे धान्याचे शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे वाटप होत नसल्याचे आढळून आले आहे . तसेच कार्डधारकांना नियमानुसार धान्य दिल्यानंतर पॉज मशिनची पावती न देता मॅन्युअली पावती दिली जाते . 


सदर रास्त भाव दुकानातील तपासणीतील दोष हे मध्यम स्वरूपाचे असल्याने सौम्य कारवाई करित असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सांगत आहेत कोणत्याही परिस्थितीत पॉस मशिनवरील पावती शिवाय शिधापत्रिकेवरील धान्य वाटप केले जाणार नाही याची हमी दुकानदार देत आहेत याच्या पाठीमागे गौडबंगाल काय ? असा प्रश्न उपस्थित नागरिकांमधून उपस्थित होत आहे .

Post a Comment

0 Comments