Breaking News

बढती! मंगळवेढा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकास मिळाली पोलिस निरिक्षकपदाची बढती

 बढती! मंगळवेढा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकास मिळाली पोलिस निरिक्षकपदाची बढती 



मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे यांना पोलिस निरिक्षकपदी बढती मिळाल्याने त्यांची बदली पुणे सी.आय.डी.विभागात झाली आहे.


मंगळवेढा पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरिक्षक म्हणून जून 2019 पासून ते कार्यरत होते.


त्यांना पोलिस निरिक्षकपदी बढती मिळाल्याचा संदेश बुधवारी रात्री पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सांगितले.


त्यांच्या कारकिर्दीत सरकोली येथील एका युवकाला कर्नाटकात पळवून नेवून  त्या इसमाचा खून करून मृतदेह दगडाच्या खाणीत फेकून दिला होता.


हा तपास आव्हानात्मक असताना  त्यांनी एस.टी.बसस्थानकावरील सी.सी.टि.व्ही.फुटेजच्या माध्यमातून आरोपी जेरबंद करण्यात त्यांना यश मिळाले होते.


ते मूळचे पुणे-राजगुरू नगर येथील असून त्यांची पोलिस दलात सुरुवात प्रथमतः पोलिस शिपाई पदापासून 1987 ला झाली.


तदनंतर 1997 ला पोलिस हवालदार,1998 ला सहाय्यक  फौजदार, 2002 ला पोलिस उपनिरिक्षक, 2013 ला सहाय्यक पोलिस निरिक्षक, 2022 ला पोलिस निरिक्षक असा सेवेतील टप्याटप्याने प्रवास झाला.


यापुर्वी त्यांनी बृहन्मुंबई, ताडदेव, वरळी, व्ही.टी.यासह राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार, तसेच माजी ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटील यांचे विशेष सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहिले आहे.


त्यांच्या बढतीबद्दल डी. वाय. एस. पी. राजश्री पाटील, पोलिस निरिक्षक रणजित माने, सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसाो पिंगळे, सत्यजीत आवटे, अमोल बामणे, वाघमारे यांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments