खळबळ! मंगळवेढ्यात 'त्या' युवकाच्या खून प्रकरणी मारेकर्याविरूध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा तालुक्यातील डोणज शिवारात ऊसतोड कर्मचार्याचा मुलगा आकाश सोमनाथ वालेकर (वय 23रा.जाटनांदूर जि.बीड) याचा अज्ञात मारेकर्यांनी अज्ञात कारणावरून भगव्या रंगाच्या कपडयाने गळफास देवून जीवे मारून खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अज्ञात मारेकर्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी सुरज वालेकर (ट्रॅक्टर चालक) हा ऊसतोड मजूर असून भालेवाडी शिवारात ऊसतोडीनिमित्त कोपी करून कुटुंबासह रहावयास आहे.
मयत आकाश वालेकर हा दि.26 जानेवारी रोजी याची अचानक प्रकृती खराब झाल्याने उपचारासाठी ऊस शेतमालक रावसाहेब लिगाडे (रा.डोणज) यांच्या मोटर सायकलवरून डॉ.रेश्मा बुगडे व डॉ.गौरीशंकर बुगडे यांच्या दवाखान्यात नेण्यात आले होते.
डॉ.रेश्मा बुगडे यांनी मयताची तपासणी न करताच सलाईन लावावी लागेल असे सांगून सलाईन लावले. व फिर्यादी ऊसतोडणीसाठी ऊस फडावर गेले. संध्याकाळी 6.00 च्या दरम्यान फिर्यादी हे दवाखान्यात आले असता त्यांचा भाऊ आकाश दवाखान्यात नसल्याचे दिसून आले.
याबाबत डॉक्टरांकडे चौकशी केली. तदनंतर फिर्यादीचा भाऊ हा कॅनॉलजवळ बिराजदार यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली कोणीतरी अज्ञात मारेकर्यांनी अज्ञात कारणावरून भगव्या रंगाच्या कपडयाने गळफास देवून जीवे मारून खून केला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

0 Comments