google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पाचेगाव बु. येथील मच्छिन्द्र घोडके यांना 'महा उद्योग रत्न' पुरस्कार जाहीर

Breaking News

पाचेगाव बु. येथील मच्छिन्द्र घोडके यांना 'महा उद्योग रत्न' पुरस्कार जाहीर

 पाचेगाव बु. येथील मच्छिन्द्र घोडके यांना 'महा उद्योग रत्न' पुरस्कार जाहीर



सांगोला/प्रतिनिधी - अनि न्युज, उद्योजक मासिक, न्युज 18 लोकमत व एमसीईडी यांनी एकत्रित येऊन संयुक्तरित्या निवड केलेल्या प्रक्रियेत पाचेगाव बु. येथील युवा उद्योजक मच्छीन्द्र आबासाहेब घोडके यांना 'महा उद्योग रत्न' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.


       पाचेगाव बु. सारख्या छोट्या खेड्यात काही वर्षांपूर्वी 'अनुष्का प्लॅस्टिक इंडस्ट्रीज' या नावाने फर्मची स्थापना केली. कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी ही फर्म अगदी अल्प काळातच नावारूपाला आणली. या फर्मद्वारे त्यांनी शेतकऱ्यांना अगदी सवलतीच्या दरात शेततळ्यासाठी लागणारा कागद, मल्चिंग पेपर, शेडनेट त्याचबरोबर फलबागेला ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठीच्या कागदाचा पुरवठा करत आपल्या उद्योगधंद्यात मोठी उत्तुंग भरारी घेतली आहे. 


       त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना उद्योग जगतात श्रेष्ठ समजला जाणारा 'महा उद्योग रत्न' पुरस्कार जाहीर जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्काराचे वितरण दि. 18 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments