google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषदेमार्फत 14000 रोप क्षमतेच्या "वसुंधरा रोपवाटीकेची" निर्मितीहरित सांगोला च्या दिशेने मोठे पाऊल !

Breaking News

सांगोला नगरपरिषदेमार्फत 14000 रोप क्षमतेच्या "वसुंधरा रोपवाटीकेची" निर्मितीहरित सांगोला च्या दिशेने मोठे पाऊल !

 सांगोला नगरपरिषदेमार्फत 14000 रोप क्षमतेच्या "वसुंधरा रोपवाटीकेची" निर्मितीहरित सांगोला च्या दिशेने मोठे पाऊल !



सांगोला नगरपरिषदेमार्फत 14000 रोप क्षमतेच्या "वसुंधरा रोपवाटीकेची" निर्मिती

हरित सांगोला च्या दिशेने मोठे पाऊल !

सांगोला :पर्यावरण समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने सूरु केलेल्या आकाश, जल , वायू, पृथ्वी, अग्नी या पंच तत्वावर  आधारित माझी वसुंधरा अभियान 2.0 या अभियानांतर्गत पर्यावरण  संवर्धनासाठी नगरपरिषदेमार्फत  विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.याचाच एक भाग म्हणून सांगोले नगरपरिषदेमार्फत  स्वतः ची 14000 रोप क्षमतेची रोपवाटिका निर्मिती करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.


         पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकूण भूभाग क्षेत्रफळाच्या 33% क्षेत्रावर वृक्षरोपण करणे गरजेचे असते. परंतु हे करत असताना मोठ्या प्रमाणावर रोपांची उपलब्धता होणे गरजेचे आहे व हे अत्यंत खर्चिकही आहे.  रोपवटीकेमुळे हवे तेव्हा रोपे घेता येतात व रोपवाटिमध्ये तयार रोप उच्च दर्जाची असतात, गुणवत्तेची खात्री असते तसेच रोपे विकत घेण्यासाठी येणाऱ्या खर्चाची बचतही होत असल्यामुळे सांगोले नगरपरिषदेमार्फत स्वतःची रोपवाटिका तयार करण्यात आली. 


या रोपवाटिकेमुळे पुढील काळात शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करून सांगोला शहराला हरित करणे शक्य होणार आहे. ही रोपवाटिका 400 चौमी एवढ्या जागेवर तयार करण्यात आली असून रोपवाटिका तयार करण्यासाठी बंद पडलेल्या हातपंपांचे पाईप्स वापरण्यात आले असून त्यावर शेडनेट बांधण्यात आले.


 या रोपवाटिकेत पाईप्स उभे करणे, शेडनेट बांधणे, पिशव्यांत माती भरणे, बिया टोकणे, विविध कलमांची रोपे तयार करणे ही सर्व कामे  पूर्णपणे नगरपरिषद कर्मचाऱ्याद्वारे करण्यात आली असून पाणीपुरवठा विभागाकडील भंगारात पडलेल्या टाकाऊ पाईप पासून एखाद्या खाजगी नर्सरीला लाजवेल अश्या पद्धतीची सुंदर नर्सरी निर्माण केल्याची  माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.


            सदर रोपवाटिका निर्मितीसाठी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने व पाणीपुरवठा कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

स्वतः च्या मालकीची रोपवाटिका तयार झाल्याने रोपांची अनुपलब्धता, रोपांवर होणार खर्च या गोष्टी टाळल्या जाणार आहे व पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वृक्ष रोपण करणे शक्य होणार असून "वसुंधरा रोपवाटीकेची" निर्मिती ही 'हरीत सांगोला' च्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे.


 *कैलास केंद्रे*

 मुख्याधिकारी,सांगोला नगरपरिषद

Post a Comment

0 Comments