जिल्हा परिषद , पंचायत समिती व नगरपालिका । निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात मोर्चेबांधणी
सांगोला ( प्रतिनिधी ) : सांगोला नगरपालिकेची निवडणूक कधीही लागू शकते . त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी राजकीय जोर बैठका घेण्यास सांगोल्यात सुरुवात झाली आहे . दरम्यान , येत्या काही दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडून बॉर्डरचना होण्याचे संकेत असून त्यादृष्टीने
राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले असून आता राजकीय बैठकांचे सत्र गतीमान झाले आहे . नव्यजन्यांची मोट बांधून प्रस्थापितांना योग्य ते उत्तर दिले जाईल . नगरपालिका निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा झाली असून पुढील रणनीती ठरविण्यात येईल असे खात्रीलायक वृत्त समजले असून कार्यकर्त्यांनी निवडणूकीसाठी तयार रहा ,
असा सल्ला जोर बैठकामधून सुरू असून निवडणुकीसाठी महत्त्वाच्या विषयांवर शहराबाहेरनिवांत ठिकाणी बैठका सुरू असून विचारविनिमय करण्यासाठी बैठकांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे . सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीसह नगरपालिका निवडणुकीचे पडघड सुरू झाले असुन इच्छुकांनी पारावरच्या गप्पा वाढवल्या आहेत .
थंडीच्या वातावरणात निवडणुकीच्या गरमागरम चर्चा सुरू झाल्या आहे . प्रत्येक जिल्हा परिषद गटासह पंचायत समिती गणाच्या वर्चस्वासाठी विविध पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत . महाविकास आघाडीचा प्रयोग स्थानिक पातळीवर सांगोला तालुक्यातफारसा यशस्वी होईल असे वाटत नाही .
स्थानिक राजकारण , एकमेकांतील द्वेष यामुळे पक्षाच्या स्वतंत्र आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत . सांगोला तालुक्यातील सर्व निवडणूका बिनविरोध करा , अशीही चर्चा सध्य सुरू असून याबाबत मात्र काही पक्षा कडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार नसल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जत आहे .

0 Comments