google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील संताप जनक घटना ; विषारी औषध पाजून पहिल्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न !

Breaking News

सांगोला तालुक्यातील संताप जनक घटना ; विषारी औषध पाजून पहिल्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न !

 सांगोला तालुक्यातील संताप जनक घटना ;  विषारी औषध पाजून पहिल्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न !


सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळींनी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास देत वेळोवेळी मारहाण केली . दरम्यान पतीने दुसऱ्या पत्नीसह बहीण , भाऊजी , भाचा , भाची यांच्या मदतीने पहिल्या पत्नीला विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . ही घटना १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास काशिदवाडी (सोनंद) , ता . सांगोला येथे घडली . 


याबाबत मनिषा विजय भोसले या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पती विजय भाऊसाहेब भोसले , सवत कविता विजय भोसले , नणंद आशा बाबासाहेब निकम , नणंदेचा पती बाबासाहेब निकम , नणंदेचा मुलगी पुजा निकम , नणंदेचा मुलगा स्वप्निल बाबासाहेब निकम यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 


याबाबत अधिक माहिती अशी , महूद ता . सांगोला येथील मनिषा यांचा विवाह वीस वर्षापूर्वी काशिदवाडी सोनंद ता . सांगोला येथील विजय भाऊसाहेब भोसले याच्यासोबत झाला आहे . सासु राजाक्का व नणंद आशा या तुला रात्रीचे दिसत नाही असे म्हणुन मनिषाला दमदाटी करीत होत्या . 


पती नांदवत नसल्याने मनिषा यांनी सांगोला व पंढरपुर कोर्टात दावे दाखल केले आहेत . दरम्यान विजय याने दुसरे लग्न केल्याचे समजल्यानंतर सहा वर्षांनी नातेवाईकांच्या मध्यस्थीने मनिषा या सोनंद येथे नवरा विजय याच्यासोबत नांदण्यासाठी गेल्या होत्या . 


विजय भाऊसाहेब भोसले हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत असून तो दुसरी पत्नी कविता व आई राजक्का यांच्यासोबत उत्कर्षनगर भांडुप मुंबई येथे राहत होता . मनिषा या पती विजयच्या मालकीच्या सोनंद येथील एका खोलीत दोन मुलांसह राहून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होत्या . 


नणंद आशा , सवत कविता ,पुजा नणंदेचा नवरा बाबासाहेब हे गावी आल्यानंतर तू या घरात राहायचे नाही , हे घर आमचे आहे असे म्हणुन दमदाटी करत होते . दरम्यान १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास पती विजय भोसले , सवत कविता भोसले , नणंद आशा निकम , तीचा नवरा बाबासाहेब निकम , 


तीची विवाहीत मुलगी निकम व मुलगा स्वनिल निकम हे मनिषाच्या घरात आले . त्यांनी तु आताचे आता घरातून तुझे सामान घेऊन माहेरी जा असे म्हणाले . पती विजय , सवत कविता , नणंद आशा यांनी मनिषाला हाताने मारहाण केली . हिला जिवंत ठेवायचे नाही , हिला मारून टाकूया असे म्हणून आशा व कविता यांनी मनिषाच्या गळयाला 


धरले तर पुजा व बाबासाहेब यांनी दोन्ही हात धरले . स्वनिल याने विषारी औषधाची बाटली आईच्या हातात देवुन हिला विष पाजून मारून टाका म्हणजे आपले घर मिळेल नाहीतर ही घर सोडणार नाही असे म्हणून त्याने हातातील बाटली आशा व कविता यांच्या हातात दिली . 


त्या दोघींनी मनिषाचे नाक दाबून तोंड उघडुन औषधाची बाटली मनिषाच्या तोंडात ओतली . घशात जळजळ होऊ लागल्याने ती बेशुध्द पडली . भाऊ समाधान आसबे याने बहीण मनिषाला पुढील उपचारासाठी सांगोल्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे . सध्या त्यांच्यावर सांगोल्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार आहेत .

Post a Comment

0 Comments