खळबळजनक ! उरुळी कांचन येथे सापडले छाटलेल्या मृतदेहाचे शीर ...
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस येथील भीमा नदी किनाऱ्यावरील पुलाजवळ शुक्रवारी (दि.4) शीर, दोन्ही हात कोपरापासून, दोन्ही पाय गुडघ्यापासून छाटलेला मृतदेह आढळून आला.
रविवारी (दि.6) या शरीराचा व हाताचा भाग उरूळी कांचन येथील जुन्या तांबेवस्ती जवळ एका ओढ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. शरीराचा भाग या ठिकाणी सापडल्याने उरळी कांचन येथे खून झाल्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड (वय-45 रा. भवरापूर, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संतोष यांचा मासेमारीचा व्यवसाय आहे. मंगळवारी (दि.1) दुपारी भवरापूर येथून बहिणीला भेटण्यासाठी म्हणून बाहेर पडले.
त्यानंतर त्यांच्या शरीराचे धड व हात-पाय छाटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर आज (रविवार) दुपारी चारच्या सुमारास संतोष यांचे शीर व एका हाताचा भाग सापडला. याची माहिती स्थानिक लोकांनी लोणी काळभोर पोलिसांना दिली.
संतोष हे भीमा व मुळा-मुठा नदीवर अनेक वर्षापासून मासेमारी व्यवसाय करत होते.
त्यांचा अशा प्रकारे निर्घृण खून कोणी आणि कशासाठी केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अद्याप मृतदेहाचे एक हात व दोन्ही पाय गायब असल्याने खूनाचा तपासाचा उलगडा होणे बाकी आहे.
दरम्यान, या ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे लोणीकंद पोलीस ठाण्याचे
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम.के. पाटील
लोणी काळभोरचे उपनिरीक्षक सदाशिव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
0 Comments