जिल्ह्यातील शाळा सोमवारऐवजी मंगळवारीपासून होणार सुरू
प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार यांची माहितीसोलापूर,दि.६ (जिमाका): भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने राज्य शासनाने सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे.
यामुळे उद्या सोमवार दि.७ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू होणाऱ्या सर्व शाळा मंगळवारपासून सुरू होतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी दिली आहे.
0 Comments