google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कत्तलखान्यावर रेड टाकायला गेलेल्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला ; मोठी घटना

Breaking News

कत्तलखान्यावर रेड टाकायला गेलेल्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला ; मोठी घटना

 कत्तलखान्यावर रेड टाकायला गेलेल्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला ; मोठी घटना


उस्मानाबाद : बेकायदेशीर गोवंश जनावरांच्या कत्तलखान्यावर पोलिसांनी रेड टाकली असता  जमावाने केलेल्या हल्ल्यात पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते, प्राणी संरक्षण अधिकारी असे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.


उस्मानाबाद परिसरातील मागील अनेक वर्षापासून गोवंशीय जनावरांच्या बेकायदेशीर कत्तली करून ते मांस वेगवेगळ्या ठिकाणी पार्सल केले जात असल्याची माहिती बार्शी इथं राहणारे प्राणी संरक्षण अधिकारी धन्यकुमार पटवा यांना मिळाली. त्यांनी ही माहिती सोलापुरातील गोरक्षक सतीश शिरसिल्ला, पवन कुमठे, सिद्राम चिरकोपल्ली, प्रशांत परदेशी यांना दिली. त्यांनी ही माहिती उस्मानाबाद च्या पोलीस अधीक्षक जैन यांना ही माहिती दिली.


पोलीस अधीक्षकांनी कत्तलखान्यावर छापा टाकण्यासाठी 30 पोलिसांचे विशेष तपास पथक, दंगा नियंत्रण पथक पाठवले सोबत सोलापुरातील गो रक्षक, व धन्यकुमार पटवा हे गेले होते. तिथे सुमारे 150 ते 200 गो वंशीय जनावरांच्या कत्तली करून 3 आयशर भरून ते मांस पार्सल केले जाणार होते.रेड पडताच मोठ्या जमावाने हातात गज, हत्यार,पाईप घेऊन पोलीस पथकावर हल्ला केला या प्राणघातक हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.


जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे, गंभीर जखमी धन्यकुमार पटवा यांनी याबाबत माहिती देताना कुरेशी समाजाच्या जमावाने हा हल्ला केल्याचा आरोप केला, सोलापूर आणि उस्मानाबाद परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या  कत्तलखान्यावर पोलीस प्रशासनाची धाक नाही त्यामुळे यामध्ये सरकारने लक्ष घालून असे प्रकार बंद करावेत अशी मागणी केली.

Post a Comment

0 Comments