google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगळवेढयाच्या तत्कालीन पोलिस नाईकास मावस भावाच्या खून प्रकरणी जन्मठेप

Breaking News

मंगळवेढयाच्या तत्कालीन पोलिस नाईकास मावस भावाच्या खून प्रकरणी जन्मठेप

 मंगळवेढयाच्या तत्कालीन पोलिस नाईकास मावस भावाच्या खून प्रकरणी जन्मठेप


मंगळवेढा ( प्रतिनिधी ) : मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला तत्कालीन पोलिस नाईक दत्तात्रय भोसले याने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेला त्याचा मावस भाऊ नितीन यादवचा खून करून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी त्याला दोषी धरून अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की , वायफळ , ता.जत येथील नितीन अर्जुन यादव , हा आरोपी दत्ता भोसलेचा मावस भाऊ होता तो दि.२जुलै २०१७ रोजी आषाढी वारीसाठी गावावरून पंढरपूर येथील दिंडीमध्ये गेला होता.त्याच्याजवळ २ सिमकार्ड असलेला मोबाईल होता , याशिवाय कपड्याच्या पिशवीत दोन मोबाईल चार्जिंगच्या पॉवर बँक व कपडे होते . एकादशी झाल्यानंतर तो घराकडे जाण्यासाठी ५ जुलै रोजी पंढरपूर येथून निघून सांगोला तालुक्यातील घेरडी येथे आला व तेथूनच तो बेपत्ता झाला होता.


 याबाबत सांगोला पोलीस स्टेशनला  मिसींग तक्रार दाखल करण्यात आली होती .  दि . ५ जुलै रोजी दुपारी ३.१० वा.त्याचा मोबाईल बंद झाला होता .  दरम्यान , मयत नितीन यादव याचा भाऊ प्रदीप यादव याने आपल्या भावाला whatsapp वरून दि . ७ जुलै २०१७  रोजी हाय असा मेसेज टाकला होता . मात्र सदरचा मोबाईल बंद असल्याने तो मेसेज  डिलीव्हर झाला नव्हता . 


त्यानंतर  अहमदनगर जिल्ह्यात असणाऱ्या कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी बाभुळगाव या रस्त्याच्या कडेला दि .६ जुलै २०१७ रोजी एक अनोळखी मृतदेह सापडला होता . नंतर त्याची ओळख पटवून मयत व्यक्ती ही वायफळ , ता . जत येथील नितीन अर्जुन यादव असल्याचे निष्पन्न झाले होते .


 दरम्यान , अचानक एकेदिवशी आपण पाठविलेला मेसेज डिलीव्हर झाल्याचे प्रदीप याच्या लक्षात आल्याने त्याने हा मेसेज किती तारखेला डिलीव्हर झाला हे पाहिले असता मयताचा मोबाईल दि . २६ जुलै २०१७ रोजी चालू होता . हे त्याच्या लक्षात आल्याने त्याने लगेच याचे सर्व स्क्रीन शॉट काढून ते कर्जत पोलीसांना पाठविले होते . या माहितीच्या आधारे सायबर क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी त्या मोबाईलचे लोकेशन मंगळवेढा असल्याचे कळविल्यानंतर 


दि .१३ ऑगस्ट २०१७ रोजी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंतराव भोये , सायबर क्राईमचे सुनिल पवार , हवालदार दादासाहेब भापकर , पो . ना.भाऊसाहेब कुरूंद , दत्तात्रय कासार चालक हृदय घोडके आदींची पथक मंगळवेढ्यात दाखल झाले व दत्ता भोसले हा त्यावेळेस गार्ड ड्युटीवर असताना मंगळवेढ्याचे स.पो.नि. सचिन हुंदळेकर यांनी भोसले ला बोलावून घेवून सर्व टीम भोसले याच्या राहते घरी गेली .

 व त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता मयत नितीन यादव याचा सोनेरी रंगाचा मोबाईल दत्ता भोसलेच्या घरी सापडल्याने दत्ता भोसलेला कर्जत पोलीसांनी ताब्यात घेतले . त्यावेळेस आपले पितळ उघडे पडल्याचे लक्षात येताच दत्ता भोसले यांनी हा खून केल्याचे कबुल केले होते .


 त्यावेळीत्याचेविरूध्द भा.दं. वि.सं. कलम ३०२ , २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून त्याचेविरूद्ध खटला सुरू होता . यात त्याला अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी धरून जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे .

Post a Comment

0 Comments