google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रवाशांनो लक्ष द्या…! एसटी विलिनीकरणासंदर्भात समोर आली मोठी अपडेट

Breaking News

प्रवाशांनो लक्ष द्या…! एसटी विलिनीकरणासंदर्भात समोर आली मोठी अपडेट

 प्रवाशांनो लक्ष द्या…! एसटी विलिनीकरणासंदर्भात समोर आली मोठी अपडेट



मुंबई – लालपरीने प्रवास करू इच्छित असणाऱ्या प्रवाशांना अजून काही दिवस लालपरीची वाट बघावी लागणार आहे. कारण एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने विलिनीकरणाबाबत अहवाल सादर करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मागितली आहे. माहितीनुसार, समितीने आणखी दोन आठवड्यांची तोंडी मुदत मागितली आहे. यामुळे आणखी काही दिवस एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. तेव्हापासून एसटी कर्मचारी राज्य सरकारविरोधात आंदोलन करत आहे. मात्र अद्यापही या आंदोलनाला यश आलेले नसू यातील काही कामगार कामावर परतले आहे. तर दुसरीकडे काही कर्मचारी आंदोलनावर ठाम असून विलिनीकरण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे.


दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात उच्च स्तरीय त्री सदस्यीय समितीची स्थापना करून विलिनीकरणावर अभ्यास करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयानं 12 आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्फत अहवाल न्यायालयात सादर करण्याचे सूचना दिल्या होत्या. ही मुदत 3 फेब्रुवारीला संपली होती. मात्र अद्यापही अंतिम अहवाल तयार झालेला नाही. यामुळे अहवाल तयार करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत सरकारकडून मागण्यात आल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.


दुसरीकडे तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने आर्थिक तंगीला कंटाळून आतापर्यंत एकूण 80 जणांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश असल्याचा दावा एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. सध्या 65 हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी आहेत. गेल्या तीन महिन्यांत 11 हजार 24 कर्मचाऱ्यांवर निलंबानाची कारवाई करण्यात आली असून, 8 हजार 629 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments