google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची वाणीचिंचाळे येथील सहयाद्री देवराईला भेट

Breaking News

सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची वाणीचिंचाळे येथील सहयाद्री देवराईला भेट

 सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची वाणीचिंचाळे येथील सहयाद्री देवराईला भेट 



सांगोला तालुक्यातील सहयाद्री देवराईची पहिली देवराई


सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे गावात सहयाद्री देवराई, सामाजिक वनविभाग व ग्रामपंचायत वाणीचिंचाळे व ग्रामस्थ यांच्या सहयोगाने 8 हे क्षेत्रावर 8500देशी झाडे लावण्यात आली आहेत.या झाडांची पहाणी करण्यासाठी सिनेअभिनेते सयाजी शिंदे, सहयाद्री देवराईचे सचिन चंदने,सिनेअभिनेते चरण उपस्थित होते. यावेळी या देवराईचे लोकार्पण करण्यात आले.


यावेळी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी गाडी ,बंगला आपापल्या आँक्सीजन देत नाहीत परंतु वनसंवर्धन केले तर आपण जगु शकतो असे सांगितले. त्यासाठी आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने योगदान द्यावे असे आवाहन केले. तसेच वाणीचिंचाळे देवराई टिमचे कौतुक केले कि उजाड माळरानावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अतिशय चांगल्याप्रकारे हि देवराई जोपासली आहे.


तसेच यावेळी महाराष्ट्र सहयाद्री देवराईचे सचिन चंदने यांनी ही देवराईसाठी योगदान देणाऱ्या लोकांचे आभार व्यक्त केले. तसेच भविष्यात ही देवराई महाराष्ट्रात नंबर एकची म्हणून नावाजली जाईल असे सांगितले. तसेच वाणीचिंचाळे ग्रामस्थ व टिमचे कौतुक केले.तसेच यावेळी सिनेअभिनेते चरण यांनी गाण्याच्या माध्यमातून वनसंपदा जतन करणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच उपस्थितांनी या गाण्याला दाद दिली.


सर्वप्रथम सयाजी शिंदे व सचिन चंदने व चरण यांची महिला वर्गाने औक्षण करून टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थी व वारकऱ्यांच्या दिंडीत स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार दुपडे सर यांनी केले तर प्रास्ताविक चिदानंद स्वामी यांनी केले व आभार प्रदर्शन जितेंद्र गडहिरे यांनी मानले.


यावेळी सयाजी शिंदे यांनी ग्रामपंचायत व सहयाद्री देवराई टिमचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी अनेक देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संपूर्ण सहयाद्री देवराईची पहाणी करून अधिकाऱ्याना हि देवराई चांगली होण्यासाठी सुचना देण्यात आल्या.तसेच भविष्यात करण्यात येणारे नियोजन करण्याचे सांगितले.


यावेळी नानासाहेब लिगाडे, पियुषदादा साळुंखे गटविकास अधिकारी आनंद लोकरे, सभापती राणीताई कोळवले,राहुल शहा,अंकुश पडवळे,डॉ महेश लिगाडे, सामाजिक वनविभागाचे मोहन ताम्हाणे,वनविभागाचे शिंदे,रणदिवे, गायकवाड, वनपाल मनिषा उगाडे


 मँडम,यांच्या सह वाणीचिंचाळे गावाचे सरपंच प्रियंका गडहिरे, उपसरपंच लक्ष्मी घुणे,ग्रामसेवक सुनिल साळुंखे,माजी सरपंच चिदानंद स्वामी, बाबुराव सोपे, शंकर गडहिरे, विनोद गडहिरे, महेश गडहिरे, कैलास गडहिरे, संतोष पवार, हणमंत जुजारे, विजय पवार, गोरख येजगर, सर्जैराव झाडबुके, तंटामुक्त अध्यक्ष भिमराव पाटील, माजी उपसरपंच बापुदीन शेख,सुनिल गायकवाड, 


अमोल पवार,बंडू सोपे,सचिन गडहिरे, सुकदेव गंगाधरे, बबन टेकनर, रेवण पाटील, हरीदास गवळी, सदाशिव जुजारे, दत्तात्रय झाडबुके गुलाब गडहिरे, यांच्या सह गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी व महिला वर्ग व सहयाद्री देवराईची टिम वनविभागाचे कर्मचारी,विद्यार्थी ,शिक्षक व झाडावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments