शिवणे ( ता.सांगोला ) येथील शेतकऱ्यासह जी आर इन्फ्रा कंपनीला बेकायदा गौण खनिज उत्खनन प्रकरणात तब्बल २९४ कोटी दंड ; तहसीलदार अभिजात पाटील यांची कारवाई
सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तब्बल पावणे तीन लाख ब्रास गौणखनिज ( मुरूम ) बेकायदा उत्खनन करणाऱ्या जी.आर. इन्फ्रा प्रा.लि.कंपनीसह संबधित शेतकऱ्याला सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांच्याकडून तब्बल २९४ कोटी ४२ लाख ३५ हजार ३५० रुपयांच्या दंडात्मक कारवाईचे आदेश पारीत केले आहेत .
तसेच पुढील सात दिवसांत खुलासा करण्याचे सूचित करण्यात आले आहे . तशी नोटीस या कंपनीच्या व शेतकऱ्याच्या नावे बजावण्यात आली आहे . मिळालेल्या माहितीनुसार सांगोला तालुक्यातील शिवणे येथील जमीन गट नंबर २८० , २८४ , २८६ , २८७ , २९० , २९१ , २९ २ / २२८९ , मध्ये अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करण्यात आले आहे .
यासंदर्भात शिवणे गावकामगार तलाठी यांनी १६ डिसेंबर २०२१ रोजी सदर जागेची पाहणी करून पंचनामा केला होता . पंचनामा अहवालात या ठिकाणावरून २ लाख ७७ हजार ७५८ ब्रास इतक्या मोठ्या प्रमाणात गौणखनिज ( मुरुमाचे ) बेकायदा उत्खनन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे .
सदर जागी उत्खनन करीत असताना जिल्हाधिकारी कार्यालय (गौणखनिज ) किंवा तहसील कार्यालय सांगोला यांची कोणतीही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले .
त्यानुसार सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी जी.आर. इन्फ्रा कंपनी आणि शिवणे येथील संबधित शेतकरी यशवंत मारुती हजारे यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे जुने कलम ४८ ( ७ ) नुसार या बेकायदा गौणखनिज उत्खननासाठी
२९४ कोटी ४२ लाख ३५ हजार ३५० रुपयांची दंडाची नोटीस बजावली आहे . याबाबतचा लेखी खुलासा सदरची नोटीस मिळताच तहसील कार्यालयात सात दिवसात सादर करावा . अन्यथा आपले काही म्हणणे नाही असे समजुन महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे दुरुस्त कलम ४८ ( ८ ) ( १ ) शासन परिपत्रक दि .११ मे २०१५ अन्वये पुढील कारवाई करण्याचा इशारा दिला आहे .

0 Comments