google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एसटी महामंडळात कंत्राटी चालकांची भरती

Breaking News

एसटी महामंडळात कंत्राटी चालकांची भरती

 एसटी महामंडळात कंत्राटी चालकांची भरती


एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागील तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू आहे. त्यामुळे राज्यातील एसटी वाहतूक अद्याप पूर्ववत होऊ शकलेली नाही. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून कंत्राटी चालकांची भरती करण्यास सुरुवात झाली आहे. काही महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने वाहक भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीतच इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन पुरवण्याचे कंत्राट दिलेल्या ट्रायमॅक्स कंपनीला हे काम दिले असून त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.



गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटीत ८२ हजार ४८९ कर्मचारी असून, केवळ २७ हजार ९८५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. अद्याप ५४ हजार ५९४ कर्मचारी संपात सहभागी आहेत. यामध्ये आतापर्यंत चार हजार ५०७ चालक हजर झाले असून, २५ हजार ८३ चालक संपात सहभागी आहेत. तर, चार हजार ६३० वाहक कर्तव्यावर असून २० हजार २८० वाहक संपात सहभागी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहक-चालक कर्मचारी कामावर हजर झाले नसल्याचे दिसते. 


मात्र, हे सर्व चालक, वाहक सेवेत आल्याशिवाय एसटी पूर्णपणे सुरळीत होऊ शकत नाही. त्यामुळे महामंडळाने मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांकडून नुकतीच ८०० कंत्राटी चालकांची भरती करण्यास सुरुवात केली आहे. संपामध्ये सहभागी एसटीचे चालक परतले नाहीत, तर या भरती संख्येत आणखी वाढ केली जाणार आहे. त्यासाठी या आठवड्यात निविदाही काढण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments