google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी घटना ! पती शेततळ्यात पाय घसरून पडला , त्याला वाचवण्यासाठी पत्नीने पाण्यात मारली उडी पण .....

Breaking News

दुर्दैवी घटना ! पती शेततळ्यात पाय घसरून पडला , त्याला वाचवण्यासाठी पत्नीने पाण्यात मारली उडी पण .....

 दुर्दैवी घटना ! पती शेततळ्यात पाय घसरून पडला , त्याला वाचवण्यासाठी पत्नीने पाण्यात मारली उडी पण .....



अहमदनगर जिल्ह्यातील आंचलगाव ( कोपरगाव ता . ) शिवारात शेततळ्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या पती पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे . कोपरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले आहे या घटनेने आंचलगावात शोककळा पसरली आहे .


 याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की , आंचलगाव परिसरातील रहिवाशी पूजा निलेश शिंदे ( वय २२ ) आणि निलेश रावसाहेब शिंदे ( वय २७ ) असे मृत्यु झालेल्या पती पत्नीचे नाव आहे . मयत निलेश हा उच्च शिक्षित असून , वर्षभरापूर्वीच त्याचा पूजा हिच्याशीविवाह झाला होता . 


मंगळवार रोजी वीज नसल्याने पूजा निलेश शिंदे व तिचा पती निलेश हे जनावरांना पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेले होते . पाणी भरत असताना निलेश यांचा पाय शेततळ्याच्या कागदावरून घसरून ते शेततळ्यात पडले . आपल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नी पुजाने पाण्यात उडी मारली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे . 


या संदर्भात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तळ्यातील पाणी कमी करून दोघांना शेततळ्याबाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .

Post a Comment

0 Comments