पोलिसावर तलवार हल्ला : चार जणांना पोलीस कोठडी !
पंढरपूर : पोलिसावर झालेल्या तलवार हल्ला प्रकरणी चार जणांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंढरपूर येथील लक्ष्मी टाकळी येथे पोलिसावर झालेल्या तलवार हल्ल्याची तालुकाभर चर्चा सुरु आहे. टाकळी उपनगरातील जगदंबा नगर येथे सरकारी कामाच्या निमित्ताने गेलेल्या पोलिसावर किरकोळ कारणावरून तलवारीने हल्ला केल्याबाबत
चार जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रस्त्यावरील वाहन बाजूला घ्यायला सांगितल्याच्या कारणावरून पोलिसावर तलवारीने हल्ला झाला. सुदैवाने पोलीस कर्मचारी स्वप्नील वाडदेकर हे यातून बचावले आहेत. वाडदेकर यांनी कौशल्याने हा हल्ला चुकविला त्यामुळे ते बचावले गेले.
सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुभम शशिकांत भोसले, सूचित शशिकांत भोसले, शशिकांत जगन्नाथ भोसले, रेखा उर्फ सुरेखा शशिकांत भोसले या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या चौघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता या चारही जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. किरकोळ कारणावरून पोलिसावर तलवारीने हल्ला झाल्याने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जगदंबा नगर येथे रस्त्यावरच एक वाहन आडवे लावलेले होते त्यामुळे पोलीस कर्मचारी स्वप्नील वाडदेकर यांनी ते वाहन बाजूला घेण्यास सांगितले. यावेळी वाहन बाजूला घेण्याऐवजी 'तू कोण सांगणार ?' असा सवाल करीत आपसात वाद सुरु झाला. हा वाद वाढत गेला आणि भोसले यांनी घरातून तलवार आणून पोलिसावर तलवारीने वार केला.
पोलीस कर्मचारी यांनी तो वार चुकविला त्यामुळे ते थोडक्यात बचावले गेले. वाडदेकर यांना उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकाराने खळबळ उडाली असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आणि न्यायालयासमोर उभे केले. यावेळी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

0 Comments