google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विजेचा धक्का लागून तरुण विद्यार्थ्याचा मृत्यू !

Breaking News

विजेचा धक्का लागून तरुण विद्यार्थ्याचा मृत्यू !

 विजेचा धक्का लागून तरुण विद्यार्थ्याचा मृत्यू !

मंगळवेढा : शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील डिकसळ गावी घडली असून या घटनेने गाव शोकाकुल झाले आहे. 


विजेची उपकरणे हाताळताना अत्यंत काळजी घेण्याची गरज असते, थोडासा निष्काळजीपणा झाला तरी त्याची मोठी किंमत मोजावी लागते. असाच काहीसा पण अकस्मात हा प्रकार घडला आणि एका १८ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यास प्राणाला मुकावे लागल्याची अत्यंत वाईट घटना घडली आहे.  सांगोला येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या हर्षराज उदय शिंदे या तरुण विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. 


महाविद्यालयीन शिक्षण घेणारा हर्षराज शिंदे आज शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. दरम्यान वीज पुरवठा बंद पडल्याने त्याने विहिरीवर असलेल्या फ्युजच्या पेटीत पहिले आणि तेथे फ्यूज बसविण्याच्या प्रयत्नात असतानाच अचानक वीज पुरवठा सुरु झाला. काय होतेय हे लक्षात येण्याआधीच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि यातच तो गतप्राण झाला. या घटनेबाबत सतीश शिंदे यांनी मंगळवेढा पोलिसात खबर दिली आहे. 


महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुण विद्यार्थ्याचा अशा प्रकारे अंत झाल्याची माहिती गावात समजताच संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. अचानक वीज पुरवठा बंद पडला आणि काही क्षणात सुरु देखील झाला एवढ्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे मंगळवेढा तालुक्यातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments