google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर दूध संघ : मतदान होताच करणार मतमोजणी !

Breaking News

सोलापूर दूध संघ : मतदान होताच करणार मतमोजणी !

 सोलापूर दूध संघ : मतदान होताच करणार मतमोजणी !

सोलापूर : जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीतील मतदान होताच मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी कुंदन भोळे यांनी दिली आहे. 


सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध करण्याचा नेटाने प्रयत्न झाला परंतु त्याला यश आले नाही. एक गटाने आपला विरोध कायम ठेवला आणि निवडणूक लागली गेली. या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असून ३१६ मतदार आहेत. सकाळी ८ वाजता सुरु होणारे मतदान सायंकाळी ५ वाजता पूर्ण होणार आहे. यासाठी एकाच मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. बाळे येथील जडावबाई रामसुख चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात हे मतदान केंद्र असणार आहे.  


सायंकाळी पाच वाजता मतदान झाल्यानंतर लगेच अर्ध्या तासाने या मतदानाची मोजणी करण्यात येणार आहे. मतदान केंद्रातच मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर एक तासाच्या आत निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे.  सदर निवडणूक अविरोध करण्याचा प्रयत्न अनेक नेत्यांनी केला होता पण त्याला यश आले नाही. या निवडणुकीत बड्या उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने सुरुवातीपासूनच ही निवडणूक चर्चेची ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्यानंतर अपील करण्यात आले परंतु तेथेही हे अर्ज बाद ठरल्याने या बड्या नेत्यांना प्रत्यक्ष निवडणूक लढण्यापासून दूर राहावे लागले आहे. 


जिल्हा दूध संघाच्या १७ जागांपैकी एक जाग अविरोध झाल्याने १६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. इतर मागासवर्गीय मतदार संघातून दीपक माळी हे विनाविरोध संचालक झाले आहेत. जिल्हा दूध संघाची निवडणूक सुरु झाल्यापासूनच कुठल्या ना कुठल्या कारणांनी ती चर्चेत राहिली आहे. माजी आमदार दिलीप माने आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचे अर्ज या निवडणुकीत अवैध ठरले गेले आहेत.

Post a Comment

0 Comments