google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तालुक्यातील गावांनी संरक्षणाच्या दृष्टीने सायरन बसवावेत--पोलीस निरीक्षक सुहास जगताप

Breaking News

तालुक्यातील गावांनी संरक्षणाच्या दृष्टीने सायरन बसवावेत--पोलीस निरीक्षक सुहास जगताप

 तालुक्यातील गावांनी संरक्षणाच्या दृष्टीने सायरन बसवावेत--पोलीस निरीक्षक सुहास जगताप 



लक्ष्मीनगर ग्रामपंचायत च्या वतीने सायरन लोकार्पण सोहळा संपन्न.

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुक्यातील गावांनी संरक्षणाच्या दृष्टीने सायरन बसवावेत.ग्रामसुरक्षा यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी करावी,कायदा व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी पोलीस ठाण्यास सहकार्य करावे,पोलीस ठाणे सुद्धा आपणांस सहकार्य करावे, 


असे आवाहन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी लक्ष्मीनगर ता-सांगोला येथे व्यक्त केले. लक्ष्मीनगर येथे उपसरपंच सौ स्वाती जगन्नाथ साठे यांच्या स्वखर्चातून सायरन बसविण्यात आला. त्यांचा लोकार्पण सोहळा सोमवारी संपन्न झाला. या वेळी ते बोलत होते.


      या वेळी व्यासपीठावर सरपंच धनाजी बाड, उपसरपंच स्वाती साठे,माजी सरपंच धनाजी नरळे,प्रगतिशील बागायतदार यशवंत नरळे,ग्रामसेवक लंगोटे,पोलीस कर्मचारी अप्पासो पवार,वाघमोडे,पोलीस पाटील सोमनाथ नरळे,ग्रामपंचायत सदस्य ,आदि मान्यवर उपस्थित होते.


           सांगोला शहर आणि तालुक्यात वाढत्या चोरीचे प्रमाण लक्षात घेता.या चोऱ्याना आळा घालण्यासाठी पोलिसांना सहकार्य व्हावे या दृष्टीने नागरिकांनी सजगता बाळगावी,लक्ष्मीनगर येथे बसविण्यात आलेल्या सायरन मुळे गावातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेत सूचना मिळेल,


आणि एकाच वेळी संपूर्ण गावातील घटना नागरिकांना समजतील यासाठी या सायरन चा प्रभावी वापर होईल,त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे  मत या वेळी सुहास जगताप यांनी व्यक्त केले.तत्पूर्वी  कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments