google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भाडेकरूचं मालकीणीवर जडलं प्रेम ; अनैतिक संबंधास नकार देताच केलं भयंकर कृत्य , पुण्यातील घटना

Breaking News

भाडेकरूचं मालकीणीवर जडलं प्रेम ; अनैतिक संबंधास नकार देताच केलं भयंकर कृत्य , पुण्यातील घटना

 भाडेकरूचं मालकीणीवर जडलं प्रेम ; अनैतिक संबंधास नकार देताच केलं भयंकर कृत्य , पुण्यातील घटना


पुणे, : येरवडा परिसरातील लोहगाव याठिकाणी एका 30 वर्षीय तरुणाने आपल्या मालकीणीची निर्घृण हत्या  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या  कारणातून आरोपीनं विवाहित महिलेला गळा आवळून संपवलं आहे.


 हत्या केल्यानंतर आरोपीनं महिलेचा मृतदेह घरातील बाथरुममध्ये टाकून घराला कुलूप लावून पळ काढला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. संबंधित घटना रविवारी रात्री घडली आहे.


गुलाम मोहम्मद शेख असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून तो मूळचा बिहारमधील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुलाम शेख हा लोहगाव येथील मोझेआळी परिसरात मृत महिलेच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. दरम्यानच्या काळात त्याचं घर मालकीणीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. पण अलीकडेच काही दिवसांपूर्वी मृत महिलेच्या अनैतिक संबंधाची माहिती तिच्या कुटुंबीयांना समजली. त्यामुळे त्यांनी आरोपीला घर रिकामं करण्यास सांगितलं.


येथील घर रिकामं केल्यानंतर आरोपी लोहगाव येथे संत नगर परिसरात राहायला गेला. दरम्यान घटनेच्या दिवशी रविवारी दुपारी तो मृत महिलेच्या घरी आला होता. यावेळी संबंधित महिला घरी एकटीच होती. त्यानं महिलेकडं अनैतिक संबंधाची मागणी केली. पण महिलेनं संबंध ठेवण्यास नकार दिला. याच कारणातून आरोपीनं पीडितेला बाथरूममध्ये घेऊन जात तिचा गळा आवळला. यानंतर घराला कुलूप लावून त्यानं घटनास्थळावरून पोबारा केला.


मृत महिलेचा पती आणि मुलं कामावरून घरी आल्यानंतर घराला कुलूप असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी रात्री उशिरा त्यांनी घराचा दरवाजा तोडला. यावेळी बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. 


या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृत महिल्च्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी गुलाम शेख विरोधात अनैतिक संबंधांना नकार दिल्याच्या कारणातून हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments