देशात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार? भाजपने आखला मास्टर प्लॅन!
मुंबई – मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये खास संघ परिवाराचे मानले जाणारे अनेक अजेंडे निकाली काढले. यामध्ये कलम 370, तिहेरी तलाक, राम-मंदीर, यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे आता पुढचा टप्पा हा समान नागरी कायदा लागू करण्याचा आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
माहितीनुसार हा अजेंडा देखील आता लवकरच पूर्ण होणार आहे. देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी मोदी सरकारने हालचाली सुरू केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. आजच्या दोन वर्षांनंतर म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा निवडणूका होणार आहे. या निवडणुकीसाठी हा भाजपचा मास्टर प्लॅन असल्याचं बोललं जातंय.
संसदेत लवकरच समान नागरी कायदा आणला जाईल, असे ट्विट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘पांचजन्य’ या प्रकाशनाने केले. तेव्हापासून हे परत एकदा प्रायव्हेट मेम्बर बिलाच्या स्वरूपात राहिल की खरच नावारूपाला येईल याची उत्सुकता नुसती राजकारणातच नाही तर सामाजिक स्तरावरही आहे. भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, मोदी सरकारने कधीच समान नागरी कायद्याकडे वाटचाल सुरु केली आहे.
मात्र असं असलं तरी मोदी सरकारचा हा अजेंडा एक एकत्रित कायद्याच्या स्वरूपात होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, मोदी सरकारला अपेक्षित असणारी कायद्यातील समानता ही खास करुन महिलासंदर्भातील लग्न, घटस्फोट, वारसाहक्क या कायद्याला घेऊन आहे. तसेच कलम 370 मुळे जम्मू काश्मिरात लागू होणारे वेगळे कायदे हा एक भाग होता.
देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे कायदे हा विषय या सरकारने निकाली काढून टाकला आहे. हा देखील समान नागरी कायद्याचाच भाग आहे. तसेच देशात पण काश्मिरच्या बाहेर जर तिथल्या स्त्रीने लग्न केले तर तिचा आधिवासाचा हक्क संपुष्टात येत होता हा देखील एक मोठा बदल मोदी सरकारने घडवून पूर्ण केला आहे. जो समान नागरी कायद्याचाच एक भाग आहे.

0 Comments