मुस्लिम स्मशानभूमी विकसित करणेसाठी 52.52 लाख मंजूर
आमदार शहाजीबापू यांच्या पाठपुराव्यास यश
सांगोला नगरपरिषद अंतर्गत 14 व्या वित्त आयोगाच्या कार्यात्मक अनुदानातून मुस्लिम स्मशानभूमी विकसित करण्याचा 52.52 लाख रुपयांच्या कामास आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे.
नगरपरिषदेस 14 व्या वित्त अयोगातून मूलभूत अनुदान व कार्यात्मक अनुदान असे 2 प्रकारचे निधी मंजूर होत असतात.यापैकी कार्यात्मक निधीमधून स्मशानभूमी विकसित करणेची कामे अनुज्ञेय असतात.
यास अनुसरून मुस्लिम स्मशान भूमी विकसित करण्याचे काम मंजुरी करिता मुख्याधिकारी यांचे मार्फत पाठविण्यात आलेले होते.मुस्लिम समाजाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या या कामाचा आमदार शहाजी बापू यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतले आहे.
यात हॉल बांधणे, पेविंग ब्लॉक टाकणे,पत्राशेड बांधणे अश्या प्रकारची कामे केली जाणार आहेत.पुढील 2 दिवसात सदर कामाची निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून लवकरच या कामास सुरुवात केली जाणार आहे.
मुस्लिम समाजाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारा व अनेक वर्षांपासून रखडलेला हा विषय मार्गी लागल्याने मुस्लिम समाजातुन आनंद व्यक्त होत आहे.


0 Comments