google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : ग्रामीणमधील शाळा उघडल्या ; सकाळी १० ते ५ भरणार वर्ग

Breaking News

सोलापूर : ग्रामीणमधील शाळा उघडल्या ; सकाळी १० ते ५ भरणार वर्ग

 सोलापूर : ग्रामीणमधील शाळा उघडल्या ; सकाळी १० ते ५ भरणार वर्ग


सोलापूर : कोरोनामुळे बंद झालेल्या ग्रामीणमधील शाळा उद्यापासून (मंगळवारी) पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करून सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत शाळा भरतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार ग्रामीणमधील पहिली ते बारावीपर्यंतच्या तीन हजार 884 शाळा आता नियमित सुरू होणार आहेत. 


राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून (मार्च 2020) शाळांचे वेळापत्रक कोलमडले आहे. कोरोनाच्या दोन्ही लाट ओसरल्यानंतर निर्बंधाच्या कवचात काही दिवसांसाठी शाळा सुरू झाल्या. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या. सोलापूर शहरातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. आता ग्रामीणमधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तेथील शाळादेखील सुरू होणार आहेत. 


ग्रामीणमध्ये जिल्हा परिषदेच्या (प्राथमिक) दोन हजार 797 शाळा असून माध्यमिक विभागाच्या एक हजार 87 शाळा आहेत. त्या शाळांमध्ये जवळपास साडेसहा लाख विद्यार्थी आहेत. शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गोडी कमी झाली असून दुसरीकडे ऑनलाइन शिक्षणासाठी ऍन्ड्राइड मोबाइल नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेले आहेत.


आता शाळा सुरू होणार असल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तरीही, शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवस विद्यार्थ्यांना कोरोनासंबंधीची माहिती देऊन त्यापासून सुरक्षित राहण्याचेच धडे दिले जातील. दरम्यान, आजारी असलेल्या विद्यार्थ्यांवर विशेष वॉच ठेवण्यासंबंधीच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. 


लक्षणे असलेल्या शिक्षकांनीही तत्काळ कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. काही शाळांमध्ये जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी किरण लोहार हे भेटी देणार आहेत. त्याठिकाणी कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे होते की नाही, याची खातरजमा करतील.


ग्रामीणमधील सर्व शाळा मंगळवारपासून (ता. 8) सुरू होतील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेची वेळ असणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हाताची स्वच्छता, सॅनिटायरझरचा वापर अशा सर्व नियमांचे पालन तंतोतंत करणे सर्वांना बंधनकारक असेल. त्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर असणार आहे.

- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर


ग्रामीणमधील शाळांची स्थिती...

"झेडपी'च्या शाळा

2,797

विद्यार्थ्यांची संख्या

2.01 लाख

"माध्यमिक'च्या शाळा

1,087

प्रवेशित विद्यार्थी

4.53 लाख

Post a Comment

0 Comments