मा. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली ताडी दुकान केमिकल युक्त भेसळ ताडी विक्री रोखण्यासाठी बंडखोर सेना पक्षाची मागणी
विषय:- राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक व अन्न औषधप्रशासन आयुक्त सांगली यां कार्यालयास प्रस्तावित ताडी दुकान केमिकल युक्त भेसळ ताडी विक्री रोखण्यासाठी सुचना देण्याबाबत? महोदय. वरील विषयासाठी अनुसरून निवेदन करीत आहेत की. सांगली जिल्ह्यातील प्रस्तावित ताडी दुकानेची संख्या पाहता 24 दुकाने आहेत आणि जिल्हातील खानापूर-विटा .
जत. कवठेमहांकाळ येथे तालुक्यातील परिपक्व ताडी देणारे झाडाची आहेत अशी जत तहसीलदार व खानापूर-विटा तहसीलदार, कवठेमहांकाळ तहसीलदार यानीआपनास मा. जिल्हाधिकारी सांगली आणि राज्य उत्पादन शुल्क सांगली यास आपलेकडील पत्राने माहिती साठी सविस्तर सादर केली गेली
आहे त्या अनुषंगाने प्रस्तावित ताडी विक्री दुकाने सुरू आहेत. केमिकल युक्त भेसळ विक्री केली येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे व्यसनाधीन असलेल्या घंटकाचे आरोग्य धोक्यात येवून कित्येक कुटुंब उध्वस्त झालीअसून येणाऱ्या काळात अनेक कुटुंब उध्वस्त होवू शकतात याचा विचार लक्षात घेता महाराष्ट्र शासन निर्णय
दि.30ऑगस्ट 2021शासन अधिसूचना नुसार सांगली जिल्ह्यामध्ये ताडीमधे होणारी भेसळ उपाय योजना केलेल्या दिसून येते नाहीत व आयुक्त राज्य उत्पादन शुल्क. मुंबई याचे परिपत्रक दी. 21ऑटोबर 2003 मध्ये नमूद केलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेनालाॅजी हैदराबाद यानी ताडीतिल भेसळओळखण्यासाठी विहीत केलेल्या कार्यपद्धती
आणि मे. हाफकीन इन्स्टिट्यूट,परेल मुंबई अथवा अन्य शासन मान्य संस्था मधून ताडी गुणवतेवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी एकत्रितपणे कारवाई करावीभेसळ बाबत नमूने पाठवावेत हया सुचना देण्यात यावे त्या अनुषंगाने शासन निर्णय प्रमाणे अमंलबजावणी केली
तर जिल्हा मधे ताडीचे प्रस्तावित दुकाने आहेत त्या दुकानास केमिकल भेसळ करण्यास आळा बसेल व ताडी पिणाऱ्यास ताडी च्या झाडापासून तयार झालेली व काढलेली ताडी पिणाऱ्यास मिळेल व आरोग्य उतम राहील अशी बंडखोर सेना पक्षाची मागणी आहे तरी आमची मागण्या मान्य केली नाही तर आपल्या कार्यालयावर सनदशीर मागाणे लक्षवेधी आंदोलन सुरू करण्यात येईल याची नोंद घ्यावी
निवेदन देता वेळी सांगली जिल्हा शहर अध्यक्ष, मा. निलेश मोहिते.बंडखोर सेना पक्षाचे नेते. मा. शिवाजी मोरे. बंडखोर सेना पक्षाचे. मिरज तालुकाचे युवक अध्यक्ष. मा. गौतम कांबळे मा. देवानंद भोरे मा. अनुराज होळकर हे पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments