हरिभाऊ पाटील यांची काँग्रेस कमिटीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल घेरडी ग्रामस्थांच्यावतीने सत्कार संपन्न
सांगोला / प्रतिनिधी : काँग्रेसचे नेते हरिभाऊ पाटील यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रविवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी घेरडी ग्रामपंचायत सदस्य व मायाका उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्रीनिवास दादा करे , माजी सरपंच दिलीप मोटे , अश्याक खलिफा सर ,
आदिवासी धनगर साहित्य संमेलनाची संचालक कृष्णा बुरुंगले , सुरेश कोळेकर ,प्रभुलिंग स्वामी , रमेश गुत्तेदार , शशिकांत कोळी , अनिल बेहरे , सीबीएसचे संपादक चाँद शेख तोफिक तांबोळी यांच्या वतीनेसत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . यावेळी हरिभाऊ पाटील यांनीघेरडी येथील मॉसाहेब उरूस दर्गा येथे जाऊन दर्शन घेतले . सत्कारावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

0 Comments