पंतप्रधान मोदी स्टेजवरच कार्यकर्त्याच्या पाया पडले; काय आहे खास कारण?
नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. बऱ्याचदा ते आपल्या वेगळ्या अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. पुन्हा एकदा उत्तर प्रदेश निवडणुकीच्या एका रॅलीमध्ये असंच दृश्य पाहायला मिळालं. यानंतर सगळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करू लागले आहेत. हे दृश्य उन्नाव रॅलीमधील आहे, जेव्हा मंचावर जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांनी पंतप्रधानांना भगवान श्रीरामांची मूर्ती भेट दिली.
अवधेश कटियार पंतप्रधानांना ही मूर्ती भेट दिल्यानंतर त्यांच्या पाया पडले. हे पाहून पंतप्रधानांनी लगेचच त्यांना थांबवलं आणि स्वतःच त्यांच्या पाया पडू लागले. इशारा करूनच त्यांनी हे स्पष्ट केलं, की कोणी माझ्या पाया पडावं असं मला वाटत नाही. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यासाठी अनेकजण पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. भाजप नेता अरुण यादव यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत लिहिलं की ‘एका कार्यकर्त्याच्या पाया फक्त मोदीजीच पडू शकतात. याचं कारण हे आहे की श्रीरामांची मूर्ती देणाऱ्याकडून आपल्या पाया पडून घेऊ शकत नाही.
व्हिडिओमध्ये दिसणारे उन्नाव जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांचं नुकतंच प्रमोशन केलं गेलं होतं. आधी ते भाजपचे उन्नावमध्ये जिल्हा महासचिव होते. मात्र निवडणुकीच्या आधी त्यांना जिल्हाध्यक्षाची जबाबदारी दिली गेली. उन्नावमधील 6 विधानसभेच्या जागांसाठी 23 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अशात अवधेश कटियार यांची मोठी भूमिका असणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या उन्नाव रॅलीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी पुन्हा एकदा अखिलेश यादवर जोरदार टीका केली. त्यांनी कुटुंबवादाचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधानम्हणाले की या कुटुंबवाद्यांसाठी फक्त त्यांचे हक्क महत्त्वाचे आहेत. जर उत्तर प्रदेशच्या लोकांचा कधी अपमान झाला तर हे डोळे बंद करून घेतात.

0 Comments