google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरातील भुयारी गटार योजना सुरू करण्याचा मार्ग अखेर मोकळा

Breaking News

सांगोला शहरातील भुयारी गटार योजना सुरू करण्याचा मार्ग अखेर मोकळा

 

सांगोला शहरातील भुयारी गटार योजना सुरू करण्याचा मार्ग अखेर मोकळा

 आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाने नव्याने प्रकल्प अहवाल तयार करण्यास शासनाची मान्यता.

सांगोला (वार्ताहर)सांगोला शहरातील गेली दहा वर्षे रेंगाळलेला व शहराच्या आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा असणारा सांगोला शहर भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सन २०१२साली  नगर परिषदेने निविदा मागवून खाजगी कंपनीकडून याचा प्रकल्प अहवाल तयार केला होता 


व या अहवालाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता यावर महाराष्ट्र शासनाने या अहवालाची तांत्रिक तपासणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे कडून न करता आयआयटी मुंबई या संस्थेकडून करण्यास सांगितले यावर गेली दहा वर्षे वारंवार प्रयत्न करूनही या अहवालाचे तपासणी होऊ शकली नव्हती त्यामुळे चालू बाजारभावा नुसार या या प्रकल्पाची किंमत वाढली आहे 


आमदार शहाजीबापू पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या योजनेचा नव्याने प्रकल्प अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून करून घेण्यासाठी व या अहवालाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी मान्यता देण्याची विनंती केली होती.


 यावर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित मान्यता देऊन लवकरात लवकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे कडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेऊन यास तांत्रिक मान्यता घेऊन सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे सांगोला शहर भुयारी गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


आमदार शहाजीबापू पाटील यांनी नगरपालिकेचे प्रशासक तथा तहसिलदार व मुख्याधिकारी यांना याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेसोबत तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच या योजनेचा सविस्तर अहवाल व अंदाजपत्रक तयार करून शासनाकडून यास मंजुरी मिळविणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments