कै . मा . आ . गणपतराव देशमुख व शेकापचे नाव घेत काहीजण सामान्य लोकांना धमकावत आहेत
सांगोला:- २०१ ९ च्या विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत अगदी थोडक्या मतांनी पराभूत झालेले शेकापचे उमेदवार डॉ . अनिकेत देशमुख यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करत सांगोला तालुक्यातील जनतेला महत्वपूर्ण आवाहन केल्याने सांगोला तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे . डॉ . अनिकेत देशमुख यांच्या फेसबुक पेजवरून आज गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी एक पोस्ट करण्यात आली
असून या नुसार सांगोला तालुक्याचे दैवत स्वर्गीय माजी आमदार देशमुख व शेतकरी कामगार पक्षाचे नाव वापरून सामान्य नागिरकांना धमकावणे व त्यांना मानिसक त्रास देणे असे प्रकार करत आहेत . या बाबतच्यातक्रारी डॉ . अनिकेत देशमुख यांच्याकडे प्राप्त झाल्याचेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे .
जर अशा प्रकारे कोणी पक्षातील अथवा पक्षाबाहेरील लोक त्रास देत असतील तर सर्वसामान्य जनतेने तात्काळ संर्पक करावा , भेट नाही झाली तर फोन करावा असे आवाहन डॉ . अनिकेत देशमुख यांनी केले असून स्व . आबासाहेब किंवा पक्षाच्या प्रतिमेला कोणी धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असा इशाराही दिला आहे .
0 Comments