भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार, धमकी देऊन पैसेही उकळले
नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भोंदूबाबाने भावाच्या मदतीने एका महिलेसह तिच्या तीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत.
मुलीला जादूटोणा झाल्याचा सांगत सलग दोन वर्षांहून अधिक काळ भोंदूबाबा आणि त्याच्या भावाने आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केला. ही घटना येवला शहरात घडली असून या संदर्भात दोन जणांवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळण्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भोंदूबाबा आणि त्याच्या भावास ताब्यात घेतले असून रात्री उशिरा दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चाकूचा धाक दाखवत बलात्कार
मुलीचं लग्न जमत नसल्याने तालुक्यातील एका गावातील बाबाकडे गेली असता बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे असं सांगितलं. त्यावर उपाय करण्यासाठी भोंदूबाबाने आईसह तिन्ही मुलींना पिण्याच्या पाणी दिले आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवत फिर्यादी मुलीवर बलात्कार केला. इतकेच नाही तर बलात्कार करतानाचा व्हिडीओ शूट केला.
बलात्कार करुन पैसेही उकळले
भोंदूबाबा नाव सुफी अजीज अब्दुल बाबा आणि जब्बार शेख या दोघांनी तब्बल दोन वर्षे 4 महिने वेळोवेळी आई आणि तिच्या तिन्ही मुलींवर बलात्कार करून ब्लॅकमेल करत पैशाची मागणी देखील केली. तसेच एका मुलीस हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करून मुस्लिम बनण्यास प्रवृत्त केले. या प्रकरणी येवला शहर पोलीस अधिक तपास करीत आहे.
0 Comments