google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अचानक बदल, ‘या’ कारणामुळे बोर्डाने घेतला निर्णय…!

Breaking News

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अचानक बदल, ‘या’ कारणामुळे बोर्डाने घेतला निर्णय…!

 बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अचानक बदल, ‘या’ कारणामुळे बोर्डाने घेतला निर्णय…!

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. परीक्षा तोंडावर आलेली असताना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारीवीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे..


बोर्डानं काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहेत. मात्र, आता त्यात अंशत: बदल करण्यात आला आहे. त्यानुसार बारावीच्या दोन पेपरच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. बारावीचे 5 व 7 मार्च रोजी होणारे पेपर, आता 5 व 7 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहेत. बारावीचा हिंदीचा पेपर 5 मार्च रोजी होणार होता. आता तो 5 एप्रिलला होणार आहे. तसेच 7 मार्चला मराठीचा पेपर हाेणार होता. आता तो 7 एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले..


कशामुळे झाला बदल..?

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला 23 फेब्रुवारीला आग लागली होती. पुणे-नाशिक महामार्गावर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील चंदनापुरी घाटात ही आग लागली.. त्यात मागच्या बाजूने टेम्पोसह आतील सगळ्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या.


परीक्षा तोंडावर असताना अशा प्रकारे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जळाल्याने या दोन्ही विषयांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय बोर्डाला घ्यावा लागला आहे. त्यानुसार, परीक्षेच्या वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आला आहे. 5 व 7 मार्च रोजी ज्या विषयाची परीक्षा होणार होती. त्यातील काही प्रश्नपत्रिका जळाल्याने या दोन विषयांचे पेपर पुढे ढकलले आहेत.


बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, “बारावीची परीक्षा ठरल्याप्रमाणे 4 मार्चपासून सुरू होणार आहे. 4 मार्चला इंग्रजीचा पेपर होईल. 5 व 7 मार्चला होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जळाल्याने हे दोन्ही पेपर पुढे ढकलले आहेत. जळालेल्या टेम्पोत मराठी, हिंदीसह रशियन, फ्रेंच, जापनीज, उर्दू, तेलगू, मल्याळम अशा इतर 25 भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिका होत्या.”


प्रश्नपत्रिका ओपन झाल्या आहेत. त्यामुळे हा ट्रक फक्त पुणे विभागाचा असला, तरी अन्य 8 विभागांनाही या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा झाला होता. त्यामुळे राज्यातील प्रश्नपत्रिका बदलाव्या लागत आहेत.. आता या प्रश्नपत्रिकांवर पुन्हा काम करून, त्या छापून वेगवेगळ्या विभागांना पाठवाव्या लागतील. त्यासाठी वेळ लागेल..


पुणे विभागाला एकूण 16 लाख प्रश्नपत्रिका लागतात. पैकी अडीच लाख प्रश्नपत्रिकांना आग लागली. त्यामुळे या विषयांची लेखी परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्याची माहिती गोसावी यांनी दिली..

Post a Comment

0 Comments