मोठी बातमी! रशियन हल्ल्यात युक्रेनचे 40 जवान ठार, अनेक जण जखमी
नवी दिल्ली - गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला रशिया आणि युक्रेनचा वाद आता युद्धात बदलला आहे. रशियाने गुरूवारी सकाळी युक्रेनवर आक्रमण केलं असून युद्धाला सुरुवात झाली आहे. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे 40 सैनिक मारले गेले आहेत. तर डझनभर जखमी झाले आहेत.
दुसरीकडे युक्रेननेही रशियाला जशाच जोरदार प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे. रशियाची पाच विमाने आणि एक हेलिकॉप्टर आम्ही पाडले, असा दावा युक्रेनने केला आहे.दरम्यान, रशिया आता युक्रेनवर तीन बाजूंनी हल्ला करत आहे. त्यांचे सैन्य युक्रेनमध्ये घुसले आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत.
रशियाने फेटाळला युक्रेनचा दावा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी पहाटे युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा करताच 5 मिनिटांत 13 ठिकाणी हवाई हल्ले झाले. यात युक्रेनने प्रत्युत्तर देऊन रशियाचे 6 लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला होता. परंतु, रशिया टुडेच्या वृत्तानुसार रशियाने हा दावा फेटाळून लावला आहे. युक्रेनने रशियाचा एकही विमान पाडलेला नाही असे संरक्षण मंत्रालयाने पत्रकाद्वारे जाहीर केले.
पंतप्रधान मोदींनी मध्यस्थी करावी, युक्रेनची याचना
युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियाकडून 12 स्फोट घडवण्यात आले आहेत. या सर्व प्रकारात युक्रेनच्या राजदूताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. युक्रेनच्या राजदूताने सांगितले की, भारताचे रशियासोबतचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे रशियाशी बोलून हा विध्वंस थांबवावा, अशी पंतप्रधान मोदींना विनंती आहे.
0 Comments