google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महावितरणाचे कार्यालय शेतकरी संघटनेने पेटवले; तीव्र आंदोलन सुरु

Breaking News

महावितरणाचे कार्यालय शेतकरी संघटनेने पेटवले; तीव्र आंदोलन सुरु

 महावितरणाचे कार्यालय शेतकरी संघटनेने पेटवले; तीव्र आंदोलन सुरु

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालयासमोर मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतून शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयाला आग लावल्याची घटना घडलली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास संतापलेल्या शेतक-यांनी कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवले.


कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयामध्ये आग लागल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक यंत्रणेची मदत घेत आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीमध्ये काही कागदपत्रे जळून खाक झाल्याची शक्यता दाखवली जात आहे. “शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढणार असल्याचा संघटनेकडून इशारा,” असे ट्विटही संघटनेच्या ट्विटर हॅण्डलवरुन हा आग लावल्याचा व्हिडीओ पोस्ट करत देण्यात आला आहे.


काल राजू शेट्टींनी या आंदोलनादरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना तुडवू, असा इशारा दिला आहे. जनतेला लुबाडायचे आणि त्यांच्या घरावर दरोडे घालायचे बंद करा असेही शेट्टी सरकारवर टीका करताना म्हणाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीला सलग दहा तास दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी केली आहे. राजू शेट्टींसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

Post a Comment

0 Comments