अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या मुलाचा आईनेच केला गळा आवळून खून
नारायणगाव : अनैतीक सबंधास अडथळा ठरत असलेल्या स्वतःच्याच तेरा वर्षाच्या मुलाचा आईने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चौदा नंबर (ता. जुन्नर) येथे घडली. फिट्सच्या अजारामुळे मुलाचा मृत्यू झाला असल्याचा बनाव करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.मात्र नारायणगाव पोलिसांनी कसोशीने तपास करून आरोपी महिलेला अटक केली. जुन्नर न्यायालयाने आरोपी महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
या प्रकरणी विद्या सचिन कदम (वय ३९ , राहणार सुवर्ण पॅलेस हॉटेल, चौदा नंबर, ता. जुन्नर) हिला आज अटक केली. आशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
भारत-इंडीजच्या सामन्यावर ऑनलाईन बेटींग; सहा जणांना बेड्या
आरोपी महिलेचा पती सचिन शंकर कदम( वय ४१) हे लोहगाव येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत आहे. कौटुंबिक वादामुळे विद्या कदम ही मुलगा राज कदम याच्यासह चौदा नंबर येथे रहात होती.
विद्या कदम हिचे दत्तात्रय गोविंद औटी (राहणार इनाममळा,बोरी बु, ता. जुन्नर) याच्याशी अनैतीक सबंध होते.अनैतीक सबंधास मुलगा राज याचा अडथळा होत होता. या मुळे २० जानेवारी २०२२ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास विद्या हिने झोपेत असताना राज याचा परकरच्या नाडीने गळा आवळला.
राज बेशुद्ध झाल्या नंतर त्याला उपचारासाठी प्रथम नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात व नंतर पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचे २७ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले. त्या नंतर विद्या हिने मुलाचा अंत्यविधी केला.
मुलाला फिट्सचा अजार असल्याची खोटी माहीती उपचारा दरम्यान आरोपी महिलेने ससून रुग्णालयातील डॉक्टरांना देऊन सत्य माहिती लपवली होती. नारायणगाव पोलीस ठाण्यात या बाबतच्या मृत्यूची नोंद झाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत असताना राज याचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय पोलिसांना आला.
या बाबत सहायक पोलीस निरीक्षक ताटे यांनी विद्या हिच्याकडे कसून चौकशी केली असता अनैतीक सबंधास अडथळा ठरत असल्याने मुलगा राज याचा गळा आवळुन खुन केल्याची कबुली दिली. या प्रकरणी सचिन शंकर कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महिलेला आज अटक केली.
या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक ताटे,फौजदार धनवे,सहायक फौजदार केंगले, के. डी.ढमाले, पोलीस कर्मचारी नविन अरगडे,सचिन कोबल,शाम जायभाये,संतोष सांळुके, शैलेश वाघमारे यांनी केला.

0 Comments