जावयाने सासूला ६० फूट खोल विहिरीत फेकल्याची घटना सासूचा मृत्यू तर चिमुकल्याने काढला पळ म्हणून वाचला जीव.
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव पोलीस चौकी अंतर्गत येत जावयाने सासूला ६० फूट खोल विहिरीत फेकल्याची घटना सासूचा मृत्यू तर चिमुकल्याने काढला पळ म्हणून वाचला जीव बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे असलेल्या शेत शिवारामधील ढोरे यांच्या शेतात रखावली करिता वास्तव्यास असलेल्या परिवारातील ६० वर्षीय मजूर महिलेला जावयाने मारहाण करून सासूला विहिरीत टाकल्याची घटना ७ फेब्रुवारी सोमवार रोजी रात्री १० च्या सुमारास घडली आहे. यात महिलेचा मृत्यू झाला असून आरोपी जावई फरार झाला आहे
बाळापुर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार वाडेगाव येथील शेतकरी ढोरे यांच्या शेतात जवाई व सासू यांचे वाद होऊन जावई यांनी सासूला मारहाण केली हा वाद विकोपाला गेल्याने जावई विलास इंगळे याने त्याची ६० वर्षीय सासू चंद्रकला दाखोरे ६० फूट खोल विहिरीत फेकल्याची घटना घडली आहे. ही घटना घडत असताना आरोपीचा दोन ते तीन वर्षांचा मुलगा घाबरून तिथून पळून गेल्याने त्याचा जीव वाचला
असल्याचे चिमुकल्याने सांगितलं आहे. ही घटना सोमवार रोजी रात्री घडली होती. या घटनेबाबत स्थानिक शेतकरी यांनी माहिती दिली त्यानुसार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी बाळापूर पोलीस स्टेशन ठाणेदार घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी पोहचून मृतक महिला चंद्रकला बळीराम डाखोरे यांना विहरितून बाहेर काढून पचनमा करण्यात आला.
त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. वाद विकोपाला गेल्याने जावई विलास इंगळे याने सासूला विरित टाकून घटनेतील आरोपी विलास मारोती इंगळे वय ३५ हा अध्याप फरार असून पुढील तपास वाडेगाव पोलीस करीत आहेत
___________________________

0 Comments