google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राहायला भाडोत्री घरात पण चार कोटींच्या नोटा

Breaking News

राहायला भाडोत्री घरात पण चार कोटींच्या नोटा

 रहायला भाडोत्री घरात पण चार कोटींच्या नोटा 

राहायला भाडोत्री  घरात पण चार कोटींच्या नोटा


नवी दिल्ली : भाड्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीकडे तब्बल चार कोटींचं घबाड सापडलं असून ही रक्कम पाहून पोलीस आणि आयकर अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत. 


निवडणूक समोर असल्याने नोएडा पोलीस सतर्क झालले असून त्यांनी आधीच संशयित ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. शस्त्रास्त्र, दारू तसेच अन्य प्रतिबंधित बाबी या वस्तूंच्या तस्करीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.  पोलिसांनी ही मोहीम हाती घेतल्याने सेक्टर ४४ मध्ये प्रेमसिंग नावाच्या व्यक्तीच्या घरात मोठी रक्कम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रेमसिंगला स्वत:चे घर नाही त्यामुळे तो भाड्याने एका घरात राहतो. ज्याला स्वत:चे घर नाही त्याच्या घरात काय मिळणार ? असा प्रश्न कुणालाही पडणे स्वाभाविक आहे. 


मिळालेल्या माहितीच्या आधाराने पोलिसांनी त्याच्या भाडोत्री घरावर छापा टाकला आणि पोलीस चक्रावून गेले. त्याच्या घरात प्रचंड नोटा आढळून आल्या. पोलिसांनी लगेच आयकर विभागाला याची माहिती दिली. आयकर विभागाने या नोटांची मोजणी केली असता ३ कोटी ७० लाख ५० हजार रुपये असल्याचे समोर आले.  ज्याला राहायला घर नाही त्याच्या घरात नोटांच्या बंडलांच्या थप्पी पाहून कुणीही थक्क होणारच ! पोलिसांचेही तसेच झाले ! 


काही दिवसांपूर्वी एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याच्या घरात ६५० लॉकर आणि त्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम असल्याचे आढळून आले होते आणि ही रक्कम आयकर विभागाने जप्त देखील केली होती. ही रक्कम दुसऱ्यांची असून आम्ही केवळ लॉकर भाड्याने देतो 


असे या अधिकाऱ्याने सांगितले होते. आता या प्रेमसिंगच्या घरात एवढ्या नोटा कुठून आल्या असतील हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ज्याला स्वतःचे घर नाही, जो दुसऱ्याच्या जागेत भाडे देऊन राहतो त्याकडे चार कोटींची रक्कम सापडते. या प्रकाराने पोलीस, आयकर अधिकारी बुचकळ्यात पडलेले दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments