सांगोला तालुक्यात मार्च 2023 मध्ये प्रत्येकाच्या शेतात पाणी
युती सरकारच्या काळात मंजूर झालेल्या या म्हैसाळ योजनेमुळे सांगोला तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरुपी हटणार आहे. सहा टप्प्यातून उचल पाणी असलेली ही योजना सध्या राजकीय उदासीनतेमुळे अन् ठेकेदारांच्या उदासीनतेमुळे सांगोला तालुक्यातील बळीराजाला वाकुल्या दाखवीत आहे. सद्या ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी राजकीय पाठबळाची गरज आहे. पण सांगोला तालुक्याचे लोकप्रतिनिधी याबाबीकडे ढुंकूनही पाहत नाहीत.
“कृष्णा आली हो अंगणी” या उक्तीप्रमाणे म्हैसाळ योजनेचे पाणी मागील सहा ते सात वर्षांपासून सांगोला तालुक्यात येत आहे. पण मार्च 2023 मध्ये पहिले उन्हाळी आवर्तन प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतातच येणार आहे. तर आता या उन्हाळ्यातील पाण्याचे आवर्तन 10 मार्च 2022 रोजी सुरू होणार असून 20 मार्चपर्यंत हे पाणी सांगोला तालुक्यात दाखल होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील 13 तालुक्यांचा दुष्काळ हटविण्यासाठी वरदायी ठरणाऱ्या टेंभू व म्हैसाळ या दोन उपसा जलसिंचन योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. पण ठेकेदारांनी बऱ्याच ठिकाणी ही कामे अपूर्णच ठेवल्याने अजूनही बऱ्याच गावांना हे पाणी मिळत नाही.
म्हैसाळ योजना
याचा सर्वाधिक फटका सांगोला तालुक्याला बसलेला आहे. त्यामुळे अनेक गावांना हे पाणी आजही मिळत नाही. पोटकॅनालसह बंधिस्त पाईप लाईनची बरीचशी कामे अपूर्ण, तर जी काही केली आहेत तीही निकृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात ओरड पहावयास मिळत आहे.म्हैसाळ योजनेच्या या पाण्याचा लाभ सांगोला तालुक्यातील 4 हजार हेक्टरला होत आहे. यामध्ये विशेषतः सांगोला वितरिका क्र.1 व वितरिका क्र.2 असे दोन टप्पे आहेत.
म्हैसाळ योजनेचे उपकार्यकारी अधिकारी यांनी मागील आठ दिवसापूर्वी प्रपत्र काढले आहे. उन्हाळी हंगामासाठी पाणी मागणीचे अर्ज लाभक्षेत्रातील ग्रामपंचायतींनी तात्काळ द्यावेत, असे आवाहन केले आहे. यासाठी उन्हाळी दरही जाहीर केले आहेत.
वितरिका क्र. 1 ही संपूर्ण बंधिस्त पाईप ही साडेतेरा किलोमिटर इतकी आहे. यातील सांगोला तालुक्यातील 450 हेक्टरला लाभ होत आहे. तर त्याच्या पुढे 550 हेक्टर पाण्याचा जत तालुक्यातील गावांना लाभ होतो. सांगोला वितरिका क्र. 2 ही संपूर्ण पोटकॅनॉल 19 किलोमिटर इतक्या लांबीची आहे.
या पोटकॅनॉलची कामे मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. त्यामुळे गळती मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. असे असले तरीही उन्हाळी आवर्तन हे 20 मार्च 2022 रोजी यामागेच सुरू होणार आहे.
युती सरकारच्या काळात मंजूर झालेल्या या म्हैसाळ योजनेमुळे सांगोला तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरुपी हटणार आहे. सहा टप्प्यातून उचल पाणी असलेली ही योजना सध्या राजकीय उदासीनतेमुळे अन् ठेकेदारांच्या उदासीनतेमुळे सांगोला तालुक्यातील बळीराजाला वाकुल्या दाखवीत आहे. सद्या ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी राजकीय पाठबळाची गरज आहे. पण सांगोला तालुक्याचे लोकप्रतिनिधी याबाबीकडे ढुंकूनही पाहत नाहीत.
4 हजार हेक्टरला लाभ
शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा लाभ हा सांगोला तालुक्यातील 4 हजार हेक्टरला होत आहे. यामध्ये डिकसळ, नराळे, हबिसेवाडी, पारे, हंगिरगे,गावडेवाडी व घेरडी या गावांचा समावेश आहे.
यामध्ये काही ठिकाणी बंधीस्त पाईप लाईन, काही ठिकाणी पोटकॅनल याव्दारे हे पाणी मिळणार आहे. पण यातील बरीचशी कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे सध्या तरी 2 हजार हेक्टरला हे पाणी मिळत नाही.
गतवर्षाची 16 लाखाचीथकबाकी
गतवर्षी उन्हाळी हंगामात या योजनेतून अडीच महिने हे पाणी सुरू होते. यावेळी 70 दशलक्ष घनफूट पाणी देण्यात आले. याची पाणीपट्टी 20 लाख रूपये झाली. पण संबंधित गावांनी अवघी 4 लाख रूपयेच पाणीपट्टी भरली. त्यामुळे गतवर्षाची 16 रूपये इतकी पाणीपट्टी आजही थकीत आहे. ही थकबाकी घेरडी, पारे, हंगिरगे, गावडेवाडी, डिकसळ, नराळे व हबिसेवाडी या गावांकडे आहे.
2023 मध्ये प्रत्येकाच्या शेतात पाणी
सांगोला तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी प्रत्येक शेतात मे 2023 पर्यंत मिळणार आहे. सध्या ज्याठिकाणी चेंबर सोडले आहेत तेथून पुढच्या कामांचे सर्व्हेक्षण सुरू आहे. त्याची कामे वर्षाच्या आत मार्गी लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला हे पाणी त्यांच्या शेतात पहावयास मिळणार आहे.
सांगोला वितरिका क्र.1 नादुरुस्त म्हैसाळ योजना सांगोला तालुक्यात वितरिका क्र. 1 व 2 याव्दारे विस्तारित आहे. सांगोला वितरिका क्र. 1 ही डिकसळ गावासाठी उपयुक्त आहे. ही मुख्यतः साडे तेरा किलोमिटर इतकी बंधीस्त पाईपलाईन आहे. तर त्याच्या पुढे दहा किलोमीटर इतकी ही विस्तारित आहे. पण ठेकेदाराने याची कामे अत्यंत दर्जाहीन केलेली आहेत. त्यामुळे अनेकांना या पाण्याचा लाभ मिळत नाही.
याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण काही केल्या दोन वर्षापासून याची दुरुस्ती केलेली नाही. या वितरिकेतून डिकसळमधील 450 हेक्टरला लाभ होतो. पण सध्या 150 हेक्टरलाही हे पाणी मिळत नाही. त्यामुळे या वितरिकेतून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 2023 मध्ये पाणी मिळणे शक्य आहे का? हा सवाल येथे उपस्थित होत आहे.
पाणी मागणी अर्ज द्या
म्हैसाळ योजनेचे उपकार्यकारी अधिकारी यांनी मागील आठ दिवसापूर्वी प्रपत्र काढले आहे. उन्हाळी हंगामासाठी पाणी मागणीचे अर्ज लाभक्षेत्रातील ग्रामपंचायतींनी तात्काळ द्यावेत. यासाठी उन्हाळी दरही जाहीर केले आहेतसद्या घेरडी व हंगिरगे या दोन गावातील मागणी अर्ज सांगोला कार्यालयात आलेले आहेत. तरी उर्वरित गावामधील लोकप्रतिनिधींनी पाणी मागणी अर्ज कार्यालयात सादर करावेत. हे पाणी सांगोला तालुक्यात 20 मार्चच्या येणार आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुष्काळी सांगोला तालुक्याला वरदान ठरणाऱ्या टेंभू, म्हैसाळ,नीरा उजवा कालवा यासह अन्य शेतीच्या पाण्याच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ भेट घेणार आहे. निधी असूनही कामे का केली जात नाहीत? जी कामे केली त्यांच्यामध्ये गुणवत्ता का नाही? याचाही जाब सबंधित अधिकाऱ्यांना विचारणार आहे. – डॉ. बाबासाहेब देशमुख (प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना)

0 Comments