google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी आनंदोत्सव 2022 चे आयोजन

Breaking News

राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी आनंदोत्सव 2022 चे आयोजन

 राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी आनंदोत्सव 2022 चे आयोजन

सांगोला/ प्रतिनिधी ःराजमाता महिला नागरी सह. पतसंस्था व धनगर समाज सेवा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदोत्सव 2022 याअंतर्गत महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा राबविण्याचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती राजमाता महिला नागरी सह. पतसंस्थेच्या संस्थापिका मा. नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली.


आनंदोत्सव 2022 अंतर्गत महिला दिनानिमित्त दि. 08 मार्च 2022 रोजी दुपारी 12 वाजता पारंपारीक वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कमीतकमी दोन महिला स्पर्धक आवश्यक असून त्यासाठी 50 रू. प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. त्याच दिवशी दि. 08 मार्च रोजी पारंपारिक नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी वेळ 5 ते 7 मिनिटे राहील. यासाठी कमीत कमी 4 स्पर्धक आवश्यक असून याची प्रवेश फी 200 रू. असणार आहे.


तसेच दि. 09 मार्च रोजी सकाळी ठिक 11 वाजता पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामधील पाककलेचा मेन्यू हा व्हेज बिर्याणी असून या स्पर्धेसाठी 50 रू. प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर होम मिनिस्टर स्पर्धा (मोफत प्रवेश), लकी ड्रॉ (प्रवेश फी 10 रू) या स्पर्धा होणार असून या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व कोविड योध्दा सत्कार यादिवशी म्हणजे दि. 09 मार्च रोजी दुपारी 03 वाजता होणार आहे.


या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिलांना रिटर्न गिफ्ट देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेसाठी आयोजकांनी काही नियम दिलेले आहेत. त्यामध्ये ग्रुप डान्सचे गाणे स्वतः आपल्या पेनड्राईव्ह मध्ये भरलेले असावे. (पेनड्राईव्ह मध्ये फक्त स्पर्धेतील भरलेले गाणेच असावे.), अश्लील गाणे नसावे, परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील, वरील सर्व स्पर्धेची नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख 05 मार्च 2022 राहील, वेळेनुसार स्पर्धेचे नियम बदलण्याचा हक्क संयोजकांना राहील हे नियम समाविष्ठ करण्यात आलेले आहेत.


सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी म्हणजेच नाव नोंदणीसाठी सौ. मनिषा हुंडेकरी (सेक्रेटरी, राजमाता महिला पतसंस्था) मो. 9552636949, सौ. प्रियांका श्रीराम (व्हा. चेअरमन, राजमाता महिला पतसंस्था) मो. 7038792323, सौ. ज्योती चोरमुले (मा. सेक्रेटरी धनगर समाज सेवा महिला मंडळ) मो. 9823409401, सौ. छायाताई मेटकरी (मा. नगरसेविका) मो. 9049060936, सौ. नकुशा जानकर (संचालिका, राजमाता महिला पतसंस्था) मो. 9881433648 या महिला पदाधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी सौ. राणीताई माने यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे स्थळ नंतर कळविण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments