google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या आढावा बैठकीत जयंत पाटील व दत्तात्रय भरणे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद.‌!!

Breaking News

सांगोला येथील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या आढावा बैठकीत जयंत पाटील व दत्तात्रय भरणे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद.‌!!

 सांगोला येथील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या आढावा बैठकीत जयंत पाटील व दत्तात्रय भरणे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद.‌!! 


 सांगोला:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’च्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बांधणी मजबूत करण्यासाठी थेट संवाद साधला जात असून त्यांना पक्षाच्या माध्यमातून बळ दिले जात आहे.


‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूंशी..!’ या संवाद यात्रेच्या पाचव्या टप्प्यातील आढावा बैठक सांगोला येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारिणी आढावा बैठक घेण्यात आली.


बैठकीमध्ये उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी जयंत पाटील यांनी संवाद साधला. त्यांच्या बरोबर विस्तृत चर्चा करून पक्षाची ताकत वाढवण्याबरोबरच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद देण्याबाबत सविस्तर चर्चा केली.


राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, शरद पवार साहेबांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या बांधावरचा, विद्यार्थ्यांचे तसेच महिलांचे हित जोपसणारा पक्ष आहे. या परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करत आहोत.


यावेळी आमदार दिपक साळूंखे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षाना सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, पक्षसंघटनेतील इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments