Satara Crime : अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार , नऊ आरोपींना अटक , साताऱ्यातील पाटण येथील घटना
पाटण येथील या अल्पवयीन गतीमंद मुलीला आरोपी महिला फिरायला जायचा बहाणा करुन घेऊन जायची. त्यानंतर तिची पाटण आणि आजूबाजूच्या लोकांशी ओळख करुन द्यायची. मग तिला ओळख करुन दिलेल्या व्यक्तींशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडायची.
अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार, नऊ आरोपींना अटक
कराड : अल्पवयीन मुलीवर गतीमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना साताऱ्यातील पाटण येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार पाटण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे मुलीवर झालेल्या अत्याचाराला एक महिलाच जबाबदार आहे. एका ओळखीच्या महिलेने मुलीला फिरायला जाण्याचे तसेच खाऊ आणि पैसे देण्याचे आमिष दाखवून बाहेर नेले. त्यानंतर पीडितेला आरोपींसोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडायची. पाटण याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
ओळखीतील महिलेनेचे घडवून आणले दुष्कृत्य
पाटण येथील या अल्पवयीन गतीमंद मुलीला आरोपी महिला फिरायला जायचा बहाणा करुन घेऊन जायची. त्यानंतर तिची पाटण आणि आजूबाजूच्या लोकांशी ओळख करुन द्यायची. मग तिला ओळख करुन दिलेल्या व्यक्तींशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडायची. अशा प्रकारे पाटण आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी सदर पीडितेवर वेळोवेळी विविध ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार केला. ही बाब मुलीच्या आईला कळल्यानंतर तिने तात्काळ पाटण पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करीत नऊ आरोपींना अटक केली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
वर्ध्यात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
वर्ध्यात तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना गिरड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात रविवारी उघडकीस आली. तीन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने वर्धा जिल्ह्याला हादरा बसला आहे. यापैकी दोन मुली सख्ख्या बहिणी आहेत. गिरड पोलिसांनी आरोपी नराधमास अटक केली आहे.
केशव बावसू वानखेडे (56) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपीला न्यायलयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी केशव वानखेडे हा लोखंडी पिपे विक्रीचे काम करतो. विविध गावांत जाऊन तो लोखंडी पिपे विकायचा. अशाताच तो गिरड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात दाखल झाला. गावातील रस्त्याकडेला तो पिपे विकायचा.

0 Comments