पोलीस उपायुक्त डॉ दिपाली धाटे यांचे आदेश | शहरातील अवैध धंद्यांची माहिती काढा
सोलापूर शहरामध्ये गेले काही दिवसांपासून भटका, जुगार, हातभट्टी दारु, शिंदी, गॅस वगैरे सारखे अवैध धंदे सुरु असलेबाबतची माहिती ऐकीवात आहे.
सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोनि. गुन्हेशाखा यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने त्यांचे अधिनस्त असलेले पोलीस अंमलदार यांची खास पथके तयार करुन, वरील प्रकारचे अवैध धंदे करणारे चालक/मालक यांची माहिती काढावी व कोणीही अवैध धंदा करताना मिळून आल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच आपले पोलीस ठाणे हद्दीत कोणताही अवैध धंदा चालणार नाही याची दक्षता घ्यावी.
आपले पोलीस ठाणे हद्दीत खास पथकामार्फत अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आल्यास, आपण वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अवैध धंद्यांना पाठीशी घालत आहात असा अनुमान काढण्यात येवून, पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

0 Comments