आईच्या साडीने गळफास घेऊन एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
सोलापूर : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यापासून संप सुरूच आहे. तीन महिन्यांपासून कामावर नसणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
बहुतांश कर्मचारी हे आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा दुदैवी घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर आगारातील एसटी कर्मचारी तुकाराम माळी यांच्या मुलाने आर्थिक विवंचनेतून केली आत्महत्या आहे. अमर तुकाराम माळी असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकारामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
अमर माळी याने बुधवारी राहत्या घरी आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर कोंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुमारे तीन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपात अनेक कर्मचाऱ्यांवर निंलबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतरही संपकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. तीन महिन्यापासून पगार नसल्याने आता या संपकरी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.
स्थानिक कर्मचाऱ्यांना मित्र, नातेवाइक मदतीसाठी पुढे आले. मात्र, परजिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे तालुक्यात कुणी नातेवाइक नसल्याने ते मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. सिल्लोड येथील आगारात वाशीम, अमरावती, बुलडाणा, जळगाव, बीड, अहमदनगर आदी जिल्ह्यातील जवळपास २० कर्मचारी आहेत. अनेक कर्मचारी उपजीवीकेसाठी अन्य कामे करीत आहेत. शेती, भाजीपाला विक्री, रिक्षा चालविणे आदी कामे हे कर्मचारी करीत आहेत.

0 Comments