google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून इंदापूरातील तरुणाने घेतला गळफास !

Breaking News

खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून इंदापूरातील तरुणाने घेतला गळफास !

 खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून इंदापूरातील तरुणाने घेतला गळफास !


खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून ३० वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज इंदापूर शहरात घडली आहे.


विशाल दत्तात्रय गवळी ( रा. नेताजीनगर, चाळीस फुटी रोड, इंदापूर ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज पहाटे ५ वाजता उघडकीस आली आहे. या तरुणाचे चुलते उत्तम अंकुश गवळी यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


विशाल गवळी याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हणले आहे. ही चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. विशाल याने राहत्या खोलीतील भिंतीला लावलेल्या एका कॉंक्रिट खिळ्याला सुताच्या दोरीने गळफास घेतला. घटना उघडकीस आल्यावर नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


एका खाजगी सावकाराकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. सदरचे पैसे सावकाराला परत दिले होते. तरीही सावकाराने आमच्यावर केस केली. सदर पैसे देताना सावकाराने चेक व नोटरी करून घेतली होती. त्याने खूप त्रास दिल्याने आत्महत्या करीत आहे, असे विशालने आत्महत्येपुर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नमुद केले आहे.


पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments