google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला इदगाह मैदान सुशोभिकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न मुस्लिम समाजाची चाळीस वर्षापासून ची मागणी पूर्ण झाली.

Breaking News

सांगोला इदगाह मैदान सुशोभिकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न मुस्लिम समाजाची चाळीस वर्षापासून ची मागणी पूर्ण झाली.

 सांगोला इदगाह मैदान सुशोभिकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न मुस्लिम समाजाची चाळीस वर्षापासून ची मागणी पूर्ण झाली.




 सांगोला /प्रतिनिधी.मागील चाळीस वर्षापासून मागणी होत असलेल्या सांगोला शहरातील इदगाह मैदान सुशोभीकरणाचे काम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आमदार निधीतून मंजूर झाले असून त्याचे काल आमदार शहाजीबापू पाटील यांच्या व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले गेल्या वर्षी जुलै महिन्यात सांगोला शहरातील मुस्लिम बांधव व आमदार शहाजीबापू पाटील यांची  संपर्क कार्यालय येथे बैठक पार पडली होती 



 या बैठकीमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित असणारे  शहरातील इदगाह मैदानाचे सुशोभीकरण करण्याचे काम करण्याची मागणी मुस्लिम समाजानी केली होती त्यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी इदगाह मैदानाच्या सुशोभीकरणाच्या व इतर कामांसाठी आमदार निधीतून जास्तीत जास्त निधी देऊ असे मुस्लिम समाजास आश्वासित केले होते


 इदगाह मैदानासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून नगरपालिकेकडून आरक्षित असलेल्या क्षेत्राची मोजणी करून हद्दी खुणा कायम करून घेतल्या.


 आमदार फंडातून मंजूर केलेल्या २५ लाख निधीतून इदगाह मैदानाची कुंपण भिंत बांधणे व सुशोभिकरण करणे या कामामुळे अध्यावत सुंदर असे प्रार्थनास्थळ  होणार असल्याने मुस्लिम बांधवानी समाधान व्यक्त केले व आमदार शहाजीबापू पाटील यांचे आभार मानले तसेच मुस्लिम समजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला



 यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रातील सुंदर व देखणे असे इदगाह मैदान बनवण्यासाठी  शासनस्तरावरून जास्त निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे इदगाह मैदानाचे काम  वेगाने करून वर्षभराच्या कालखंडामध्ये हे काम पूर्ण करण्यात येईल असे सांगितले 



 या प्रसंगी.. प्रा प्रबुद्धचंद्र झपके, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, बाबुरावजी गायकवाड, पियुष साळुंखे,माजी नगराध्यक्ष रफिक भाई नदाफ,दिलावर तांबोळी,  उदयबापू घोंगडे, तानाजीकाका पाटील, शब्बीर भाई खतीब, कमरुद्दीन खतीब, अब्दुल मुजावर, जुबेर मुजावर, अस्मिर तांबोळी, अलमगीर मुल्ला, तोहीद मुल्ला, सोमेश यावलकर,  यांच्यासह तहसीलदार तथा प्रशासक नगर परिषद सांगोला अभिजीत पाटील , मुख्याधिकारी कैलास केंद्रे, सां बा उप अभियंता अशोक मुलगीर व मुस्लिम बांधव उपस्थित होते,



 गेल्या चाळीस वर्षापासून सर्वच नेत्यांना वारंवार भेटून या जागेची मागणी करत होतो परंतु आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार झाल्यानंतर पाठपुरावा करून मोजणी करून घेऊन त्यांच्या आमदार फंडातून २५ लाख रुपये आमदार निधी मंजूर केला व इदगाह मैदानाचे भूमिपूजन माझ्या डोळ्या देखत झाले  माझे भाग्य समजतो आणि आमदार साहेबांचे आभार मानतो पण हे काम अजून देखणे करण्यासाठी अजून जास्तीत जास्त निधी मंजूर करावा.

-हाजी शब्बीरभाई खतीब,

Post a Comment

0 Comments