राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी निवडणूकीस तरुणाईचा अभूतपूर्व प्रतिसाद
सांगोला तालुका /प्रतिनिधी ;- देशाचे मा. केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे तसेच पक्षाचे विचार विद्यार्थी व तरुणाईपर्यंत रुजविण्यासाठी सांगोला शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीच्या नूतन पदाधिकारी निवडीचा निर्णय घेण्यात आला आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांच्या शुक्रवार दि 14 जानेवारी रोजी सांगोला येथील राष्ट्रवादी भवन येथे मुलाखती संपन्न झाल्या. या मुलाखतीस अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यावेळी पदाधिकारी होण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करून आपली ताकद दाखवली.
राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम, जिल्हाध्यक्ष राहुल कवडे, युवानेते डॉ. पियुष साळुंखे पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, युवकचे तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
सांगोला शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची ताकद दिवसेंदिवस अधिकाधिक बळकट होऊ लागली आहे.
तरूणाई तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत दिपकआबा साळुंखे पाटील यांची प्रचंड क्रेझ असल्याचे शुक्रवारी झालेल्या मुलाखतीवरून स्पष्ट झाले. तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच इतर पदांसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीस सांगोला तालुक्यातील तरुणाने उदंड प्रतिसाद देत या मुलाखत प्रक्रियेत आपला सहभाग नोंदविला.
दरम्यान शुक्रवार दि 14 जानेवारी रोजी सांगोला तालुक्याचे स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून सांगोला शहरातील वाढेगाव नाका येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नवीन शाखेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांना अभिप्रेत असणारा सांगोला तालुका प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, असा निर्धार यावेळी उपस्थित असलेल्या हजारो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
शुक्रवार दि 14 रोजी सर्व पदांसाठी मुलाखती पार पडल्या आहेत. या पदाधिकार्यांच्या निवडी सोमवार दि 17 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे नेते, मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात येतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील यांनी जाहीर केले.
0 Comments