google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजमाता जिजाऊंनी आदर्श मातेचा इतिहास घडवला_____ प्रा. चंद्रकांत इंगळे विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

Breaking News

राजमाता जिजाऊंनी आदर्श मातेचा इतिहास घडवला_____ प्रा. चंद्रकांत इंगळे विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

 राजमाता जिजाऊंनी आदर्श मातेचा इतिहास घडवला_____ प्रा. चंद्रकांत इंगळे

             


 विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.



 सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे प्रा. चंद्रकांत इंगळे, प्रा. जालिंदर राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथ राव फुले, उपप्राचार्य प्रा. विजय कुमार घाडगे, समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दीपक रिटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. 



             प्रमुख पाहुणे प्रा. चंद्रकांत इंगळे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले आपल्या देशाला महापुरुषांच्या विचारांचा वारसा लाभला आहे अनेक महापुरुष आपल्या भूमीत जन्माला आले असून त्यांनी आपल्या विचारांच्या आधारावर देशाला आकार आणि संस्कार देण्याचे मोठे कार्य केलेले आहे. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवराय यांना विचाराचं व संस्काराचं मोठ धन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण घडवली.



 शिवरायांच्या कर्तुत्वा मध्ये जिजाऊ यांचे संस्कार खूप खूप महत्त्वाचे आहेत तेव्हा या देशाला जगाला संस्काराचे धन देणाऱ्या जिजाऊ आहेत. म्हणूनच आज जिजाऊंना अभिवादन करताना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट करावेसे वाटते की राजमाता जिजाऊंनी आदर्श मातेचा इतिहास घडवला आहे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंनी रयतेच्या राज्याचे स्वप्न केवळ पाहिलेच नाही



 तर छत्रपती शिवाजी महाराजां च्या माध्यमातून ते पूर्ण केले. स्वामी  विवेकानंद यांनी शिकागो येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतून बंधू भावाचा संदेश जगाला दिला व हिंदू धर्म व्यवस्थेचे अस्तित्व व स्थान जगाला पटवून दिले. महापुरुषांचे विचार व कार्य पुढे घेऊन जाणे हेच खरे त्यांच्या प्रतिमेला पूजन करीत असताना अभिवादन असेल असे त्यांनी स्पष्ट केले.



                महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथ राव फुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवराय यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली व खऱ्या स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी हातभार लावला अशा या जिजाऊ यांच्या चरित्राची व विचारांची आज विद्यार्थ्यांना व समाजाला गरज आहे. तर स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्म व्यवस्था व जीवनातील व जगण्यातील तत्त्वज्ञान जगाला आदर्शवत करून दाखवले अशा या दोन्ही महान व्यक्तींना अभिवादन. 



विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या चरित्राची सखोल माहिती घेऊन आपल्या जीवनाला विचार व संस्कार याचे अधिष्ठान प्राप्त करून दिले पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा .विजय कुमार घाडगे यांनीही स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर मार्गदर्शन पर विचार व्यक्त केले.

              


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ. दिपक रिटे यांनी केले तर आभार प्रा. अशोक वाकडे यांनी मानले. कार्यक्रम सोशल डिस्टन शन ठेवून पार पाडण्यात आला.

Post a Comment

0 Comments