राष्ट्रवादीची वाटचाल देशपातळीकडे; उत्तरप्रदेश, मणिपूरसहित गोव्यातही निवडणूक लढवणार
आगामी 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून 5 पैकी 3 राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूका लढणार असल्याची घोषणा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.
उत्तरप्रदेश येथे समाजवादी पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांसोबत राष्ट्रवादी युती करेल. मणिपूर येथे राष्ट्रवादी 5 जागेंवर लढेल तर गोव्यात महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचेही प्रयोग सुरू असल्याचे पवारांनी सांगितले. उत्तरप्रदेश मध्ये लोकांना बदल हवा असून तिथे परिवर्तन नक्की होईल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. मी स्वतः उत्तरप्रदेश मध्ये प्रचाराला जाणार आहे असे पवारांनी सांगितले
0 Comments