'काका' हे वागणं बरं हाय का? दीपकआबा व उमेश पाटलांना चिमटे कशासाठी
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांचे राजीनामा नाट्य चांगलेच गाजले, पक्षाने राजीनामा देण्यास सांगितले, त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला, परत स्वतःहून ते मुंबईला गेले, स्वतः सोबत महेश कोठे, दिलीप कोल्हे, यांना घेऊन गेले, राजीनामा नामंजूर करण्यासाठी मग 'कोठे-कोल्हे' यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर दबाव टाकला. काका आपल्या प्लॅन मध्ये यशस्वी झाले.
वाढदिवसाच्या दिवशी जिल्हाध्यक्ष पद मिळेल या भरवशावर असलेल्या दीपक आबांचा चांगलाच हिरमोड झाला, सांगोला आणि मंगळवेढ्यात लावलेले अध्यक्ष पदाचे डिजिटल कार्यकर्त्यांना अखेर उतरावे लागल्याची माहिती आहे.मुळात अजितदादांनी दीपक आबांना विरोध केल्याची चर्चा आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अजितदादा यांच्या अतिशय जवळ असलेल्या नेत्याचाच मुळात आबांना विरोध होता, काका साठे यांच्या नंतर अध्यक्षपदाचे दावेदार जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील होते, त्यांनीही नकार दिल्याने त्यामुळे उलट काकांचा फायदा झाल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
उमेश पाटलांमुळेच काकांचे जिल्हाध्यक्ष पद शाबूत राहिल्याची एकीकडे चर्चा होत असताना पुन्हा काकांना हुक्की आली. वडाळा गावात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता बैठकीत भाषण करताना पक्षांतर्गत विरोधकांवर तोंडसुख घेतले, दिपक आबा साळुंखे आणि उमेश पाटील यांना विनाकारण चिमटे काढले.
पक्षाच्या कार्यशैलीवर त्यांनी थेट आरोप केला, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जुन्या एकनिष्ठ पेक्षा चलती का नाम गाडी एवढेच पाहिले जाते
0 Comments