google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर | पोलीस उपायुक्त बापू बांगर यांचे दोन आदेश

Breaking News

सोलापूर | पोलीस उपायुक्त बापू बांगर यांचे दोन आदेश

 सोलापूर | पोलीस उपायुक्त बापू बांगर यांचे दोन आदेश


सोलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे. सोलापूर शहरात छोटया मोठया कारणावरून सभा संप, आंदोलने, निदर्शने इ. होत असतात. सोलापूर शहरात सिध्देश्वर यात्रा साजरा होत असुन आगामी काळात प्रजासत्ताक दिन आहे.



तसेच कोवीड १९ ओमायक्रॉन या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण प्रश्न, ओ.बी.सी. आरक्षण प्रश्न येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मोर्चे निदर्शने, विरोध दर्शक आंदोलने इ.च्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश आवश्यक आहेत अशी माझी खात्री झाली आहे.



त्या अर्थी मी बापू बांगर, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/ विशा), सोलापूर शहर, मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील ३७ (३) अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरून शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी दिनांक १४/०१/२०२२ रोजीचे ००:०१ वाजले पासुन ते दिनांक २८/०१/२०२२ रोजीचे मध्यरात्री २४:०० वाजेपर्यंत मिरवणुका काढण्यास वा सभा घेण्यास ५ किंवा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील असा आदेश देत आहे.



हा आदेश लग्न, अंत्ययात्रा इ. असणार नाही. तसेच मिरवणूका, मोर्चा, रॅली, आंदोलने, निवेदने, धरणे, सभा इ.ना सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेऊन केला असेल, त्यांना लागू होणार नाही.



हा आदेश दिनांक १४/०१/२०२२ रोजी रात्री ००:०१ वाजले पासुन ते दिनांक २८/०१/२०२२ रोजीचे मध्यरात्री २४:०० वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमलात राहील.



सोलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे. तसेच सोलापूर शहरात छोट्या मोठ्या कारणावरून सभा, संप, आंदोलने, निदर्शने इ. होत असतात.



सोलापूर शहरात सिध्देश्वर यात्रा साजरा होत असुन आगामी काळात प्रजासत्ताक दिन आहे. तसेच कोवीड १९ ओमायक्रॉन या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण प्रश्न, ओ.बी.सी. आरक्षण प्रश्न येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मोर्चे निदर्शने, विरोध दर्शक आंदोलने इ.च्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाघा होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश आवश्यक आहेत अशी माझी खात्री झाली आहे.



त्या अर्थी मी बापू बांगर, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), सोलापूर शहर, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ ते फ) अन्वये असलेल्या अधिकारास अनुसरुन, शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत, खालील प्रमाणे वर्तन करण्यास मनाई करीत आहे.



अ) शस्त्रे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, काठ्या किंवा झेंडा असलेली काठी किंवा इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे.

ब) कोणताही ज्वालागृही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे.

क) दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर बाळगणे.

ड) व्यक्ती अगर प्रेत अगर त्यांचे प्रतिमा याचे प्रदर्शन करणे. इ) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे,



फ) असभ्य हावभाव करणे, असभ्य भाषा वापरणे सभ्यता अगर नितीविरुध्द निरनिराळ्या जमातीच्या भावना दुखावल्या जातील व त्यामुळे त्यांच्यात भांडणे, बखेडे निर्माण होतील अशी सोंगे अगर चिन्ह अगर दस्तऐवज अगर जिन्नस तयार करुन त्याचा प्रचारासाठी उपयोग करणे.



हा आदेश खंड अ ते क हे ज्या सरकारी नोकरांना त्यांचे कर्तव्य व अधिकार बजावण्यासाठी उपनिर्दीष्ट वस्तु हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे. अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहुन सदरचे आदेश लागू पडणार नाहीत.



सदरचा आदेश हा दिनांक १४/०१/२०२२ रोजी रात्री ००:०१ वाजले पासुन ते दिनांक २८/०१/२०२२ रोजीचे मध्यरात्री २४:०० वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अमलात राहील.



सदरचा आदेश हा माझ्या सही व शिक्यानिशी दिला आहे. सदर आदेशामुळे कोविड-१९ चे अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या कोणत्याही आदेशास बाधा येणार नाही.

Post a Comment

0 Comments